ETV Bharat / state

...म्हणून सुरू आहे डी.पी. सावंत यांच्या कटलेल्या पंतगांची चर्चा

author img

By

Published : Jan 17, 2021, 8:25 PM IST

माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्या पतंगाचा दोरा काटल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे, एका लहान मुलाने सावंत यांना मात देऊन, त्यांच्या पतंगाचा दोर काटला, यामुळे पुन्हा एकदा सावंत चर्चेत आले आहेत. मकर संक्रांतीनिमित्त नांदेडमध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नवा मोंढा मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत सावंत यांच्या पतंगाचा दोर एका लहान मुलाने काटला, त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

डी.पी. सावंत
डी.पी. सावंत

नांदेड- माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्या पतंगाचा दोरा काटल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे, एका लहान मुलाने सावंत यांना मात देऊन, त्यांच्या पतंगाचा दोर काटला, यामुळे पुन्हा एकदा सावंत चर्चेत आले आहेत. मकर संक्रांतीनिमित्त नांदेडमध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नवा मोंढा मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत सावंत यांच्या पतंगाचा दोर एका लहान मुलाने काटला, त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांचा पतंग महोत्सवात सहभाग

सावंत यांची मिश्किल प्रतिक्रिया

दरम्यान डी.पी. सावंत हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. दोनवेळा आमदार तसेच एक टर्म ते राज्यमंत्रीपदीही राहिलेले आहेत. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, त्यांच्या तुलनेत अगदी नवखा असलेल्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. नगरसेवक असलेल्या बालाजी कल्याणकर यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवाची चर्चा तेव्हा राज्यभरात झाली होती, आणि आता देखील त्यांचा पतंग एका लहान मुलाने काटल्याने त्याची देखील जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. पतंगाचा दोर काटल्यानंतर सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पतंगबाजी हा खेळ आहे, यात हार जित होत राहते. दोर काटल्यानंतर पतंग काही काळ हवेतच असतो, पुन्हा त्याला जमिनीवर यायला वेळ लागतो, असं मिश्किल उत्तर यावेळी सावंत यांनी दिलं. सावंतांच्या उत्तरानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच हश्या पिकला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.