नांदेड - राज्यामध्ये विविध ठिकाणी विकासाचे वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. महाराष्ट्राच्या सेवेची संधी मिळाल्यानंतर माझा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करण्याचा, कुठे काही नवीन असेल तर ते शिकण्याचा व त्यांचा प्रसार करण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. याचबरोबर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. नांदेड ही यातील महत्वपूर्ण तीर्थस्थळापैकी एक आहे. श्री गुरु गोबिंद सिंघजी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीस माझी यायची मनोमन इच्छा होती. त्या इच्छेने मला इथे येता आले व तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात जावून पायरीचे दर्शन घेता आले याचा मला मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
गुरुद्वाराच्यावतीने स्वागत -
राजयपालांनी नांदेड दौऱ्यात आवर्जून तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराची भेट देवून दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते. गुरुद्वाराच्यावतीने यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
हेही वाचा - एकमेकांची पाठ खाजवतात, तेच महाविकास आघाडीचे जास्त आवडते - अमृता फडणवीस