नांदेड - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करुन संचारबंदीत लागू करण्यात आली आहे. सर्व व्यवहार आणि वाहतूक बंद असल्याने अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत, यात गोरगरीब, मजूर, निराधार, दिव्यांग व्यक्तींचाही समावेश आहे. नांदेडमधील अशा गरजू लोकांना आंध्रा समितीच्यावतीने जेवण पुरवण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोना रोखण्यासाठी राज्यात सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्व्हेक्षण; घरोघरी आरोग्यसेवक पोहोचणार
नांदेडमध्ये कामानिमित्त आलेले अनेक कामगारही अडकून पडले आहेत. सध्याची परिस्थीती बघता त्यांना घरी जाणे शक्य नाही. त्यामुळे शहारत लॉकडाऊन संपेपर्यंत तेलगू भाषिक आंध्रा समिती गरजू लोकांना सेवा देणार आहे. शहारतील एकही गरजू उपाशी राहू नये याची काळजी घेतली जात आहे. यासाठी समितीचे स्वयंसेवक अठरा तास समाजसेवा करत आहेत.