नांदेड- नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभड परिसरात एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. गजानन बाबुराव महाजन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत तरुण सलूनमध्ये काम करणारा असल्याची माहिती आहे.
दाभड परिसरात झाला अपघात
नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गवर अर्धापूर तालुक्यातील दाभड परिसरात मोटर सायकल क्रमांक. ( एम.एच.२६ ए.बी. २६५३ )अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला. यावेळी गजानन बाबुराव महाजन यांचे जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या पत्नी शितल महाजन या गंभीर जखमी झाल्या आहे. तर जखमीला महामार्ग पोलीस केंद्र अर्धापूर यांच्या रुग्णवाहिकेतने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत चौकशीला सुरुवात केली आहे.
हेही वाचा-परभणी जिल्ह्यात डिवायएसपींच्या जीपला अपघात; ठेकेदारासह अभियंत्यावर गुन्हा दाखल