ETV Bharat / state

Maharashtra Politics: देवेंद्र फडवणीस, उद्धव ठाकरेंच्या बाभळीबाबतच्या प्रस्तावांना के. चंद्रशेखर रावांचा प्रतिसाद शुन्य; निवडणुकीसाठी दिले गाजर - Uddhav Thackeray on Babhali Project

बाभळी प्रकल्पाचा विषय गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रासाठी अडचणीचा ठरत आहे. तेलंगणा सरकार या प्रकरणात गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रासोबत कुठलीही चर्चा करत नाही. आता बीआरएसचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात राजकारणाचा प्रवेश करताना बाभळीसह श्रीरामसागरातून पाणी देण्याचे महाराष्ट्राला दाखवले आहे. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री, देवेंद्र फडवणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के. राव यांना पत्र पाठवल्यानंतरही के. राव यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

Maharashtra Politics
बाभळी प्रकल्प
author img

By

Published : Feb 9, 2023, 1:48 PM IST

Updated : Feb 9, 2023, 2:09 PM IST

नांदेड : नांदेडमध्ये भाषणात राज्याकडून फारसा प्रतिसाद राज्याकडून मिळाला नसल्याचे सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री एकत्र बसून तोडगा काढण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तोडग्यासाठीचा प्रस्ताव अगोदरच दिला होता. बाभळी प्रकरणात २८ फेब्रुवारी २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे २८ ऑक्टोबरपर्यंत उघडेच राहतील, असा निर्णय दिला होता. त्यासंदर्भात तडजोडीबाबत महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे प्रस्ताव दिल्यानंतर के. रावांनी ते धुडकावले होते.

प्रतिक्रिया देताना प्रवीण साले, महानगराध्यक्ष भाजप व बालाजी कोंपलवार , बाभळी बंधारा अभ्यासक

फडणवीसांचा प्रस्ताव रावांनी धुडकावला : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी १८ जानेवारी २०१९ रोजी चंद्रशेखर राव यांना बाबळी प्रकरणात पत्र पाठवले होते. त्यामध्ये फडणवीस यांनी २०१३ ते २०१५ या काळात पाण्याच्या कमतरेतेअभावी बाभळीत पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे ०.६ टीएमसी पाणी सोडता आले नाही. तसेच चागंला पाऊस झाल्यानंतर बाभळीनंतर सोडलेले पाणी पोंचमाड भरुन गेल्यानंतर समुद्रात जाते. त्यामुळे त्याचा तेलंगणाला फायदा होत नाही आणि महाराष्ट्रालाही फायदा होत नाही. त्यामुळे याबाबत आपण बसून तोडगा काढूया. याबाबत तुम्ही सांगाल त्या दिवशी मुंबईत याबाबत तुमचे जलसंपदा मंत्री अधिकारी आणि आपण बैठक घेवु. आपण त्याबाबतची वेळ तारिख कळवावी, असे पत्र लिहीले होते. मात्र त्यालाही कुठलाही प्रतिसाद के. राव यांनी दिला नाही.

राव यांनी प्रतिसाद दिला नाही : अशोक चव्हाण म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना रावांना तीन वेळा फोन केले होते. तसेच याबाबत तीन पत्र देखील राव यांना पाठवली होती. तसेच जलंसपदा मंत्री जयंत पाटील, तसेच मी देखील के. रावांना पत्र पाठवली होती. मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बाभळीचा प्रश्न सुटला नाही. बाभळीचे पाणी मिळाल्यास त्याचा फायदा त्या भागातल्या शेतकऱ्यांना होईल. मात्र ते आता देखील चर्चेस आल्यास आपण पुन्हा त्याच्याशी चर्चा करण्यात तयार आहोत.

Maharashtra Politics
बाभळी प्रकल्प

अधिकारी गेले, त्यांना भेटही नाही : याबाबत तत्कालीन जलसंपदा संचिव अजय कोहीरकर यांनी बोलतांना सांगितले की, २०१९ मध्ये मी गोदावरी पाटबंधारे महामंडळाचा मुख्य अभियंता तसेच कार्यकारी संचालक असतांनाही आपण त्याबाबत सातत्याने प्रस्ताव पाठवले. मी जलसंपदा सचिव असतांना आमचे शिष्टमंडळ याबाबत तेलंगणाच्या जलसंपदा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामध्ये बाभळी प्रकरणात चर्चा व्हावी, के. राव यांच्यासोबत बैठक व्हावी. मात्र के. राव यांच्यासोबत बैठक झालीच नाही. त्यामुळे मराठवाड्याचे पाणी समुद्रात वाहून वाया जात आहे. त्यामुळे या प्रकरणात तोडगा निघण्याची गरज आहे.

असा होता राज्याचा प्रस्ताव : बालाजी कोंपलवार यांनी सांगितले की, बाभळीमध्ये जुलै अखेर अथवा ऑगस्टपर्यत पाणी साठवू द्यावे. ज्यामुळे ०.६ टीएमसी पाणी जे तेलंगणात सोडायचे आहे, ते मार्चमध्ये सोडता येणे शक्य आहे. ऑक्टोबर २८ ला गेट टाकल्यास बाभळीत पाणी राहत नसल्यामुळे तेलंगणालाही सोडता येत नाही. पाणी सोडल्यानंतर त्याचा खर्चही महाराष्ट्र सरकार मागत नाही. तसेच दुसरा प्रस्तावामध्ये २.७५ टीएमसी क्षमता असलेल्या प्रकल्पाची ०.६ टीएमसीचे स्टोरेज कमी करावा.

हेही वाचा : Jitendra Awhad Cutting a Cake: वाढदिवसाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाडांनी शिंदे गटाला डिवचले; 50 खोके एकदम ओके लिहिलेला केक कापला

Last Updated : Feb 9, 2023, 2:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.