ETV Bharat / state

Tamasha Artiste : तमाशा कलावंत महिलेने दोन मुलांना केले सॉफ्टवेअर इंजिनिअर! तब्बल सोळा लाखांचं मिळालं पॅकेज

तमाशामध्ये नाच गाणे करून आपल्या मुलांना योग्य शिक्षण देत सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवणाऱ्या नांदेडमधील तमाशा कलावंत महिलेची गोष्ट नक्कीच प्रेरानादायी आहे. तिचा एका मुलाला तर तब्बल १६ लाखांचं पॅकेज मिळालं आहे.

तमाशा कलावंत महिलेने दोन मुलांना केले सॉफ्टवेअर इंजिनिअर.. तब्बल सोळा लाखांचं मिळालं पॅकेज..

author img

By

Published : Feb 13, 2022, 10:18 PM IST

Updated : Feb 16, 2022, 3:57 PM IST

नांदेड : संगीत पार्टित तमाशा कलावंत असलेल्या नांदेडच्या एका महिलेने आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण देऊन इंजिनिअर बनवल आहे. कलावंत म्हणून नृत्य सादर करताना शौकीन लोकांनी उधळलेल्या पैशांमधून तिने ही किमया करून दाखवली आहे. तमाशा बोर्डात कलावंत असलेल्या अनुराधाने प्रचंड आर्थिक अडचण असताना प्रसंगी पोटाला चिमटा देत मुलांना बड्या शहरात शिक्षण दिलं आहे. तिची दोन मुले शिकून आता सॉफ्टवेअर इंजिनिअर बनली आहेत. तिच्या एका मुलाला चक्क वार्षिक सोळा लाख रुपयांच्या पगाराचे पॅकेज मिळालंय तर, दुसरा मुलगा महिन्याला पन्नास हजार रुपये कमावत आहे.

तमाशा कलावंत महिलेने दोन मुलांना केले सॉफ्टवेअर इंजिनिअर...; तब्बल सोळा लाखाचे पॅकेज...!

दोन्ही मुलांना उच्चविद्याविभुषीत बनविले

लोककला, तमाशा, संगीत पार्टी याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. या ठिकाणी राहणारे, तेथे जाणारे लोक 'शौकीन' असतात असा समज असतो. फक्त मौजमजा एवढेच त्यांचे आयुष्य असे मानणाऱ्या लोकांवरही जबाबदारी असते. त्यांनाही मुला-बाळांची काळजी असते हे सत्यात उतरवून दाखविणारी घटना अलीकडे उघडकीस आली. नांदेडपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या टीपटाळा येथील मुळच्या लोककला जपणाऱ्या अनुराधा नांवाच्या ५८ वर्षीय महिलेने दोन्ही मुलांना उच्चविद्याविभुषीत बनविले.

वार्षिक १६ लाख रुपयांचे पॅकेज

इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण देवून त्यास वार्षिक १६ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले. लोककला, संगीत पार्टी चालविणाऱ्या तिसऱ्या पिढीतील अनुराधा केवळ दुसरीपर्यंत शिक्षण घेवू शकली. परंतु शिक्षणाची ताकद काय असते हे तिला कळाल्याने तिने स्वतःच्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षण देण्याची तयारी सुरु केली. परंतु दोन मुलांना इंजिनिअर बनविण्यात त्या महिलेला यश आले. एका मुलाला पुण्यातील नामवंत कंपनीत १६ लाखाचे पॅकेज आहे तर, दुसरा मुलगा एका फर्निचर कंपनीत ६ लाखाच्या पॅकेजवर कार्यरत आहे. एक मुलगा अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे शेती व्यवसाय सांभाळत आहे. मुलांना घडवित असतांना अनंत अडचणी आल्याचे अनुराधा सांगतात. त्यावेळी मुलांच्या शिक्षणासाठी मुरलीसेठ पारीख यांनी खूप चांगले मार्गदर्शन केल्याने इयत्ता तिसरीपासून नाशिकला शिक्षणासाठी पाठवू शकले, असे त्या सांगतात. शिक्षणासाठी मुलांना पैसे पुरत नव्हते, परंतु ऊसनवारी करून व लोककलेतून पैसा जमवून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्याही मुलांबाळांना घडवू द्या..!

लोककला, तमाशा, संगीत पार्टी यामध्ये तरूणांनी बुडून न जाता शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे त्या आवर्जून सांगतात. मनावर ताबा, संयम ठेवून जीवन जगा यशस्वी व्हाल, असा संदेश अनुराधा देतात. तेथे काम करणाऱ्या अन्य एका महिलेला स्वतःच्या मुलीला डॉक्टर तर अन्य एकीला स्वतःच्या मुलाला पोलीस अधिकारी बनवयाचे आहे. यासाठी शासनाकडूनही प्रत्यक्षात मदत मिळावी, एवढीच अपेक्षा तेथील महिला करत आहेत. केवळ कागदोपत्री अनुदान, मदत नको, तर आमच्याही मुलांबाळांना घडवू द्या, एवढीच केवीलवाणी विनंती त्यांनी शासनाकडे केली आहे.

ही घटना निश्चितच प्रेरणादायी

दोन्ही मुले आता आपल्या आयुष्यात स्थिर झाली आहेत. मुलं कमवती झाली असली तरी संगीत पार्टिच्या माध्यमातून जोडलेल्या सह कलावंतांसोबतच उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्धार तिने केला आहे. विशेष म्हणजे याच महिलेचा आदर्श घेऊन तिच्या सह कलावतांनी देखील आपल्या मुलांना शिक्षण देऊन अधिकारी बनवण्याचा संकल्प केलाय. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकत हे दाखवणारी ही घटना निश्चितच प्रेरणादायी अशीच आहे.

Last Updated : Feb 16, 2022, 3:57 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.