नांदेड - गोपाळचावडी भागात एका विद्यार्थ्यावर इतर काही विद्यार्थ्यांनी तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात शुभम सावळे (18) हा विद्यार्थी जखमी झाला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा... 'मंत्रालयात बसून आपल्या वेदना मी समजू शकत नाही, म्हणून प्रत्यक्ष भेटायला आलोय'
गोपाळचावडी भागात असलेल्या एका शाळेत ८ फेब्रुवारी रोजी दुपारी शुभम सावळे (१८) या तरुणासोबत काही विद्यार्थ्यांचे हॉटेलमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे त्यांनी त्याला सायंकाळी एका ठिकाणी बोलावून घेतले. त्यावेळी बंटी शिंदे, विशाल शिंदे, कृष्णा (रा. गोपाळचावडी) यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तलवारीने त्याच्या हातावर आणि पायावर वार केले. या हल्ल्यात शुभम सावळे गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शुभम सावळे याने दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा... हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया, प्रकृती नाजूकच