ETV Bharat / state

'स्वारातीम’ विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला अधिसभेची मंजुरी; गतवर्षीच्या तुलनेत तुटीत घसरण - fund for SRTMU budget

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यासाठी एन.पी.टी.एल. लोकल चॅप्टरद्वारे संलग्नित महाविद्यालयांना प्रोत्साहित करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

Swami Ramanand Teerth Marathwada University
स्वारातीम विद्यापीठ
author img

By

Published : Mar 13, 2021, 8:04 PM IST

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरता एकूण २६०.८१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. विद्यार्थ्यांचा विकास केंद्रित धरून विद्यापीठाच्या भौतिक तसेच संशोधनात्मक शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाला अधिसभेच्या ऑनलाईन बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यासाठी एन.पी.टी.एल. लोकल चॅप्टरद्वारे संलग्नित महाविद्यालयांना प्रोत्साहित करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

अधिसभेची ऑनलाईन बैठक!

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन अधिसभेची बैठक १२ मार्चला पार पडली. या बैठकीमध्ये कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्‍वर हसबे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अधिसभा सदस्य उपस्थित होते. या अर्थसंकल्पावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. महेश मगर, अधिसभा सदस्य डॉ. एस. एम. जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सिंकु कुमार, आशिष बाजपेयी, डॉ. दिपक साठे, प्रा. सुरज दामरे, डी.आर. तोष्णीवाल यांनी मते मांडली.

हेही वाचा-रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे हैदराबादमध्ये जेरबंद

४१.४४ कोटी रुपयांची तूट!

एकूण २६० कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात या वर्षी ४१.४४ कोटी रुपयांची तूट आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या अर्थसंकल्पातही तूट ४८.६८ कोटी रुपये एवढी होती. म्हणजेच या वर्षी ७.२४ कोटी रुपयांची तूट कमी झाली आहे.

  • ‘विद्यार्थी दत्तक योजना’ याकरिता १५ लाखांची तरतूद!

    विद्यार्थी विकास केंद्रित या अर्थसंकल्पामध्ये विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला चालना मिळण्यासाठी अनेक उपाय योजनेसह तरतूद केली आहे. संकुलातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी रिसर्च असोशियन या योजनेअंतर्गत मानधन या शीर्षकांतर्गत मार्च अखेर २० लक्ष उपलब्ध असून पुढील वर्षासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी दत्तक योजना’ याकरिता १५ लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा-...तर ताकदीने बेळगावात उतरावे लागेल, संजय राऊत यांचा इशारा

  • विविध कामांसाठी अशी तरतूद

    ‘सॉफ्ट स्किल अँड पर्सनालीटी, डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर’ करिता २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘कुलगुरू साह्यता निधी योजने’ करिता १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘विद्यार्थ्यांनी कल्याण दत्तक योजना’ याकरिता १५ लाख तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षात परदेशी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरिता १० लक्ष रुपयांची तरतूद करून दिली आहे. ‘स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकास केंद्रा’ करिता २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ‘स्टुडंट्स वेलफेअर अँड अवार्ड स्कीम’ या योजनेअंतर्गत २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध विकसित करण्याकरिता १० लाख तरतूद करण्यात आली आहे. एम.फिल., पी. एचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रासाठी पेपर वाचन करण्याकरिता १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत २० लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे. खेळाडू विद्यार्थ्यासाठी पारितोषिक योजनेकरिता ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी विकास विभागांतर्गत पारितोषिक योजना करिता २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद

    विद्यार्थ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण चर्चासत्र परिषद इत्यादीना हजर राहण्यासाठी १० लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे. कर्मचारी कल्याण निधीकरिता १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोव्हीड-१९ साठी उपाययोजनेकरिता १५ लाख, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी २२ लाख, कोव्हीड-१९ उपचारासाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना अग्रिम ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महिला जागृती विषयक कार्यशाळा करिता ५ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. तर विद्यापीठात दिव्यांग सहाय्यता अंतर्गत ६.३५ कोटी प्रस्तावित करण्यात आलेले आहे. या बरोबरच विद्यापीठ परिसर सुशोभित करण्याकरिता उद्यान विभागास १०७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • विद्यापीठ उपकेंद्रासाठी विकासात्मक तरतूद
    विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयातील विकासाबरोबरच विद्यापीठ उपकेंद्रासाठी विकासात्मक तरतूद करण्यात आली आहे. न्यू मॉडल डिग्री कॉलेज हिंगोलीसाठी महाराष्ट्र शासन अनुदान अंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी २०० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर सोलार सिस्टिम करिता ३० लाखांची तरतूद करण्यात आली. कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट अंतर्गत आवर्ती खर्चासाठी ३४ लाख रुपये व अनावर्ती खर्चासाठी १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लातूर येथील उपकेंद्रांमध्ये मुला-मुलींच्या वस्तीग्रह बांधकामासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परभणी येथील इमारत बांधकामासाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. विद्यापीठाने सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन लाईफ लॉंग लर्निंगची स्थापना करण्यासाठी महाविद्यालयांना भरीव तरतूद करून प्रोत्साहित केले आहे.
  • आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठीही २० लाखांची तरतूद

    संशोधन प्रोत्साहन योजनाकरिता १५ लाखांची तरतूद, महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रे परिषदा सेमीनार इत्यादी योजना करिता २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयीन संशोधक प्रकल्पासाठी ५० लाखांची तरतूद तर विद्यापीठ संकुलासाठी शिक्षक संशोधकांसाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली. संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिषदा उपस्थित राहण्यासाठी १५ लाख तर संकुलासाठी १५ लाखांची तरतूद करण्यात आली. भाषा दिनाकरिता ७ लाख तर मराठी भाषा संवर्धन पंधरवडाकरिता ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. हा विद्यापीठाचा केंद्रीय अर्थसंकल्प अधिसभेच्या ऑनलाईन बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.