नांदेड : मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कामाची चौकट (Sushma Andhare criticizes CM Shinde) फक्त नवरात्रीच्या, गणेशोत्सवाच्या आरत्या करणे, पितृपक्षात जेवणे करणे एवढीच असेल तर त्यांना मुख्यमंत्रीपदी का असावे? (Why Eknath Shinde as CM) सर्वच उद्योग गुजरातेत नेत असतील (Maharashtra Industry projects going to Gujarat) तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी (Gujarat CM should in charge of Maharashtra) करा. निदान ते तरी चांगले काम महाराष्ट्रात करतील.'' अशी मिश्किल टिप्पणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज केली. त्या माध्यमांशी बोलत होत्या. (Sushma Andhare On CM Shinde)
राजकारण तापले : वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेला आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा महाराष्ट्राबाहेर जाणारा सातवा प्रकल्प आहे. ठरवून महाराष्ट्राचे अर्थकारण खिळखिळे केले जात आहे. महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करण्याचे षडयंत्र रचले जात आहे; पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काहीही ठोस उपाय-योजना करत नाहीत.
मग सीएमपदी कशाला? सुषमा अंधाऱ्या म्हणाल्या, मुख्यमंत्री जर सातत्याने नवरात्रीची आरती करणे, गणपतीची आरती करणे, पितृपक्षाचं जेवण करणे, यालाच जर आपल्या कर्तव्याची चौकट मानत असतील, तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावे?
महाराष्ट्राचे प्रभारी बनवा.. सुषमा अंधारे म्हणाल्या, सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल, तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनवा. किमान यामुळे तरी ते महाराष्ट्राकडे व्यवस्थित लक्ष देतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि कोकणातील सिंधुदुर्ग गोव्याला जोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. जे स्वत:ला महाराष्ट्राची अस्मिता जपणारे पक्ष असल्याचे सांगतात ते पक्षही गप्प आहेत.