ETV Bharat / state

सततच्या त्रासाला कंटाळून महिला सुरक्षा रक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न; विष्णूपुरीतील घटना

कै.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा रक्षकानी वरिष्ठ अधिकाराच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

कै.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
author img

By

Published : Sep 15, 2019, 10:55 AM IST

नांदेड - विष्णुपूरी येथील कै. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन महिला सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याची घटना १४ सप्टेंबरला घडली. या दोघींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विष्णुपूरी रुग्णालयाची दृष्ये

विष्णुपूरी येथील कै.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन महिला सुरक्षारक्षक कर्मचारी शनिवारी सकाळी कर्तव्यावर आल्यावर कार्यालयात स्वाक्षरी करण्यासाठी गेले असता, वरिष्ठ अधिकारी प्रदीप उबाळे यांनी वाईट उद्देशाने हात धरून माझे ऐकत नसाल तर तुमची वर्दी उतरवून नोकरीवरुन काढुन टाकील, अशी धमकी दिली. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळुन महिला सुरक्षा रक्षकाने शनिवारी सकाळी बॅगमधील डास मारण्याचे औषध प्राशन केले, दरम्यान, सोबतच्या महिला रक्षकाने तिच्या हातातील बाटलीला धक्का दिला. यामुळे त्यातील विषारी औषध उडून तिच्याही तोंडात गेले. यानंतर घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी या दोन्ही महिला सुरक्षा रक्षकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - दिराबरोबर भांडण झालं तर कोण नवऱ्याला सोडतं का?, सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

या प्रकरणी महिला सुरक्षा रक्षकाने दिलेल्या जबाबावरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक पोनी पंडीत कच्छवे हे पुढील तपास करीत आहेत.

Intro:
नांदेड : सततच्या त्रासाला कंटाळून महिला सुरक्षारक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न.
विष्णुपुरी रुग्णालयातील घटना.

नांदेड : विष्णुपुरी येथील कै.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन महिला सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी घडली. या दोघींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.Body:
विष्णुपुरी येथील कै.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे
दोन महिला सुरक्षारक्षक कर्मचारी शनिवारी सकाळी कर्तव्यावर आल्यावर कार्यालयात स्वाक्षरी
करण्यासाठी गेले असता वरिष्ठ अधिकारी प्रदीप उबाळे यांनी वाईट उद्देशाने हात धरून माझे ऐकत नसाल तर तुमची वर्दी उतरवून नोकरीवरुन काढुन टाकील अशी धमकी दिली.त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळुन महिला सुरक्षा रक्षकाने शनिवारी सकाळी बॅगमधील डास मारण्याचे औषध प्राशन करीत असताना सोबतच्या महिला रक्षकाने तिच्या हातातील बाटलीला धक्का दिला.त्यामुळे त्यातील विषारी औषध उडून तिच्याही तोंडात गेले.त्यानंतर येथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्या दोन्ही महिला सुरक्षा रक्षकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.Conclusion:
या प्रकरणी महिला सुरक्षा रक्षकाने दिलेल्या जबाबावरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला असून पोनि पंडीत कच्छवे हे तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.