नांदेड - अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथे पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे राजाराम मारोती नरडेले यांनी करार पद्धतीने ऊस तोडणी मशीन लावली होती. ऊस तोडणी मशीन अचानक बिघडल्याने मशीन शेतातच जळून खाक झाली. ही मशीन ऊसाच्या वावरातच जळाल्याने बालाजी स्वामी यांचाही ऊस थोड्याफार प्रमाणात जळाला. परंतु, घटनास्थळी तत्काळ परिसरातील शेतकऱ्यांनी मदत करून उर्वरित ऊस जळण्यापासून वाचवला.
ऊसाची तोडणी लवकर व्हावी, यासाठी कारखाना व शेतकरी प्रयत्न करतात. परंतु, अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. परिसरात पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे भाडेतत्त्वावर म्हणजेच करार पद्धतीने मशीन मालक राजाराम मारोती नरडेले यांनी आपली मशीन कारखान्याकडे लावली होती. या मशीनने ऊसतोडी चालू असताना अचानक पेट घेतल्याने मशीन जळून खाक झाली व मशीन मालक यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. परंतु, प्रसंगावधानाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मशीनलगत ऊसाने पेट घेतला. पण, परिसरातील शेतकऱ्यांनी जळण्यापासून ऊस वाचवला. मशीन मालक राजाराम मारुती नरडेले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांनी प्रशासन व कारखान्याच्या वतीने मदत मिळावी, अशी अपेक्षा करत आहेत.
हेही वाचा - गोल्डन मॅन गोविंद कोकुलवार गोळीबार प्रकरणी सातवा आरोपी गजाआड, आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई