ETV Bharat / state

नांदेड : महाजनादेश यात्रा जाताच, मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावर - nanded animal

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत मोकाट जनावरांचा होणारा अडथळा टाळण्यासाठी महापालिकेने तीन दिवस विशेष मोहिम राबविली. यात ४३ मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यात आली होती.

महाजनादेश यात्रा जाताच, मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावर
author img

By

Published : Sep 1, 2019, 1:33 PM IST

Updated : Sep 1, 2019, 2:25 PM IST

नांदेड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत मोकाट जनावरांचा होणारा अडथळा टाळण्यासाठी महापालिकेने तीन दिवस विशेष मोहिम राबविली. यात ४३ मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यात आली. मात्र, ही यात्रा नांदेडमधून पुढच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्यानंतर मोकाट जनावरांची यात्रा पुन्हा एकदा रस्त्यावर सुरू झाली आहे. तुर्तास एक वाहन व दहा कामगारांमार्फत जनावरे पकडण्याची मोहीम दोन महिने सुरू ठेवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाजनादेश यात्रा जाताच, मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावर

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मोकाट जनावरांना रस्त्यावर मुक्तपणे संचार करता आला नाही. ज्या जनावरांच्या मालकांनी त्यांना रस्त्यावर सोडले, अशा ४३ जनावरांना महापालिकेच्या कंत्राटी मजुरांनी पकडून वाहनात बसवून कोंडवाड्यात बंदीस्त केले. एका वाहनात केवळ दोन ते तीन जनावरे बसत असल्याने ही मोहीम सुरू ठेवताना कामगारांना मर्यादा आल्या. २७ ऑगस्टला सर्वाधिक २२ जनावरे पकडल्यानंतर उर्वरीत जनावरांच्या मालकांनी रात्री मोकाट सोडण्याचे टाळले. त्यामुळे २८, ११ आणि २९ ऑगस्टला १० जनावरे पकडण्यात आली.

महाजनादेश यात्रेच्या दिवशी गोकुळ नगर भागातील आठवडीबाजार व्हीआयपी रोडवर बसू नये, यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर होती. पोलीस पथकानेही त्यांना मदत केली. त्यामळे शुक्रवारचा बाजार इंदिरा गांधी मैदान तसेच महादेव डाळ मिल ते विष्णुनगर रस्त्यावर भरविण्यात आला. मोकाट जनावरे पकडणारी यंत्रणाही रस्त्यावर थांबल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत कोठेही अडथळा आला नाही.

हेही वाचा - एक लाख रुपयांसाठी सासरच्यांनी मारहाण केल्याने विवाहितेचा गर्भपात; गुन्हा दाखल

मोकाट जनावरे दिवसभर मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर आढळतात. त्यांचे मालक कोण, हे देखील लवकर कळत नाही. मनपाच्या पथकाने पकडल्यानंतर पुढाऱ्यांमार्फत फोन करून जनावरे सोडण्यासाठी दबाव आणला जातो, असे नेहमीचे अनुभव आहेत. त्यामुळे जनावरे पकडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी किंवा ठेकेदार तयार होत नाहीत. दिवसा अशी मोहीम राबवल्यास बरेचजण रस्त्यावर वाद घालून जनावरे नेऊ देत नाहीत. त्यामुळे मोकाट जनावरांना दिवसभर रस्त्यावरून इतरत्र हाकलून लावायचे आणि रात्री वाहनात बसवून कोंडवाड्यात टाकण्याचा प्रयोग मनपाने सुरू केला आहे.

हेही वाचा - नांदेड : गुरुद्वारात पहिला प्रकाशवर्ष दिवस उत्साहात

२७ ते २९ ऑगस्ट दरम्यान पकडलेल्या ४३ जनावरांपैकी २० जनावरांच्या मालकांनी मनपाकडे दंड भरून आपले पशुधन परत नेले आहे. उर्वरीत २३ जनावरे अजुनही कोंडवाड्यात बंद आहेत. ही मोहीम किमान दोन महिने सुरू ठेवण्यासाठी आयुक्तांनी दहा कंत्राटी मजूर व एक वाहन कायम स्वरूपी ठेवण्याची परवानगी दिली आहे. गरज भासल्यास त्यात आणखी वाढ केली जाईल, असे पशू शल्यचिकित्सक डॉ. रईसुद्दीन यांनी सांगितले.

हेही वाचा - 'अशोका'चे झाड कुणाला सावली देत नाही, म्हणून नांदेडकरांनी नवीन झाड लावले - मुख्यमंत्री

Intro:नांदेड : महाजनादेश यात्रा जाताच, मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावर.

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत मोकाट जनावरांचा होणारा अडथळा टाळण्यासाठी महापालिकेने तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत ४३ मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यात आली.ही यात्रा नांदेडमधून पुढच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्यानंतर मोकाट जनावरांची यात्रा पुन्हा एकदा रस्त्यावर सुरू झाली आहे.तुर्तास एक वाहन व दहा कामगारांमार्फत जनावरे पकडण्याची मोहीम दोन महिना सुरू ठेवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.Body:
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मोकाट जनावरांना रस्त्यावर मुक्तपणे संचार करता आला नाही.ज्या जनावरांच्या मालकांनी त्यांना रस्त्यावर सोडले, अशा ४३ जनावरांना महापालिकेच्या कंत्राटी मजुरांनी पकडून छोटा हत्ती वाहनात बसवून कोंडवाड्यात बंदीस्त केले.एका वाहनात केवळ दोन ते तीन जनावरे बसत असल्याने ही मोहीम सुरू ठेवताना कामगारांना मर्यादा आल्या.२७ ऑगस्ट रोजी सर्वाधिक २२ जनावरे पकडल्यानंतर उर्वरीत जनावरांच्या मालकांनी रात्री मोकाट सोडण्याचे टाळले.त्यामुळे २८ रोजी ११ आणि २९ रोजी १० जनावरे पकडण्यात आली.महाजनादेश यात्रेच्या दिवशी गोकुळ नगर भागातील आठवडीबाजार व्हीआयपीरोडवर बसू नये, यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर होती.पोलीस पथकानेही त्यांना मदत केली.त्यामळे शुक्रवार बाजार इंदिरा गांधी मैदान तसेच महादेव डाळ मिल ते विष्णुनगर रस्त्यावर भरविण्यात आले.Conclusion:
मोकाट जनावरे पकडणारी यंत्रणाही रस्त्यावर थांबल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत कोठेही अडथळा आला नाही. मोकाट जनावरे दिवसभर मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर आढळतात.त्यांचे मालक कोण,हे देखील लवकर कळत नाही.मनपाच्या पथकाने पकडल्यानंतर
पुढाऱ्यांमार्फत फोन करून जनावरे सोडण्यासाठी दबाव आणला जातो,असे नेहमीचे अनुभव आहेत. त्यामुळे जनावरे पकडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी किंवा ठेकेदार तयार होत नाहीत.दिवसा अशी मोहीम राबवल्यास बरेचजण रस्त्यावर वाद
घालून जनावरे नेऊ देत नाहीत. त्यामुळे मोकाट जनावरांना दिवसभर रस्त्यावरून इतरत्र हाकलून लावायचे आणि रात्री वाहनात बसवून कोंडवाड्यात टाकण्याचा प्रयोग मनपाने सुरू केला आहे.२७ ते २९ ऑगस्ट दरम्यान पकडलेल्या ४३ जनावरांपैकी २०
जनावरांच्या मालकांनी मनपाकडे दंड भरून आपले पशुधन परत नेले आहे.उर्वरीत २३ जनावरे अजुनही कोंडवाड्यात बंद आहेत.ही मोहीम किमान दोन महिने सुरू ठेवण्यासाठी आयुक्तांनी दहा कंत्राटी मजूर व एक वाहन कायम स्वरूपी ठेवण्याची परवानगी दिली आहे.गरज भासल्यास त्यात आणखी वाढ केली जाईल, असे पशू शल्यचिकित्सक डॉ.रईसुद्दीन यांनी सांगितले.
Last Updated : Sep 1, 2019, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.