नांदेड - इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळली. यात ४० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन९ ८४८ क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती. अमळनेर बस अपघाताचा पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील बस स्थानकात जाऊन आम्ही आढावा घेतला असतात नांदेड जिल्ह्यातून आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक राज्यात बस नांदेडवरून जातात. शहरातून इतर जिल्ह्यात नांदेड वरून रोज 400 बसेस या प्रवाशी घेऊन ये जा करतात. प्रत्येक बस सुरक्षित आहे का? याची खात्री करून पाठवली जाते, असा आगार व्यवस्थापक कांबळे यांनी सांगितले.
प्रवास हा सुरक्षित होण्यासाठी चालकाला दर 3 महिन्याला प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक गाडीला स्पीडलॉक लावले आहे. साधी बस असेल तर 60 ते 70 ची स्पीड लॉक करून ठेवला आहे आणि शिवशाहीला 70 वर स्पीड लॉक करून ठेवला आहे. प्रवासात उशीर झाला तरी चालेल पण सुरक्षित प्रवास व्हावा, ही भावना आम्ही ठेवली असल्याचा आगार व्यवस्थापक यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Bus Fell In Narmada River : इंदोरहून अंमळनेरला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू