ETV Bharat / state

मोलमजुरी करणाऱ्या आईच्या लेकराला दहावीत मिळाले 82 टक्के, शिक्षणाच्या खर्चासाठी पेपरही टाकायचा - Shumbham Kodgirwar result Nanded

नुकतेच दहावीचा निकाल लागला. यात या वर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांना या निकालाची खूप उत्सुक्ता होती. परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश मिळवले आहे. नांदेड येथील शुंभम कोडगिरवार त्यापैकीच एक आहे. शुभमने दहावीत 82 टक्के गुण मिळवले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Shumbham Kodgirwar 10 result Nanded
शुभम कोडगिरवार दहावी निकाल नांदेड
author img

By

Published : Jun 19, 2022, 10:49 AM IST

नांदेड - नुकतेच दहावीचा निकाल लागला. यात या वर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांना या निकालाची खूप उत्सुक्ता होती. परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश मिळवले आहे. नांदेड येथील शुंभम कोडगिरवार त्यापैकीच एक आहे. शिक्षणाचे खर्च पूर्ण करण्यासाठी तो पेपर टाकायचा. पेपर टाकून तो शाळेत जायचा, आभ्यासही करायचा. त्याच्या काष्टाचे फळ त्याला मिळाले असून त्याने दहावीत 82 टक्के गुण मिळवले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Shumbham Kodgirwar 10 result Nanded
निकाल

हेही वाचा - Notice To State Government : भाजप आमदाराच्या याचिकेनंतर राज्य शासनाला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

सकाळी पाच वाजता उठायचे, एजन्सीला जायचे, तिथून वर्तमानपत्राचे गट्ठे उचलायचे आणि सायकलवर घरोघरी जाऊन वाटायचे, असा शुभम संतोष कोडगिरवारचा नित्यक्रम. दहावीचा रिझल्ट (SSC Results 2022) लागला आणि शुभमला परीक्षेत 82 टक्के गुण मिळाले. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेला शुभम सकाळी पेपर टाकून घरी येऊन शाळेत जायचा, अभ्यास करायचा. इतक्या लहान वयात परिस्थितीचे भान ठेऊन त्यानुसार योग्य ती मेहनत घेणारे मुले कमीच! शुभमने काम करून इतके गुण मिळवले आहेत हे खरेच कौतुकास्पद आहे.

दोन्ही मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव - आपल्या मुलाला शिकवण्यासाठी शुभमच्या आईने स्वतः तुटपुंज्या मानधनावर ग्रंथालयात काम केले. यापूर्वी त्यांचा मोठा मुलगा शंतनू हासुद्धा पेपर टाकून दहावीत 78 टक्के गुणांनी पास झाला होता. दोन्ही मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव होती. शुभमने सुद्धा लहान वयातच आईला हातभार लावायला सुरुवात केली. आपल्या शिक्षणाचा खर्च स्वत: करण्यासाठी तो रोज सकाळी पेपर वाटत होता. आता त्याने दहावीचे शिक्षण नुसते पूर्ण केले नाही तर दणक्यात 82 टक्क्यांसह पूर्ण केले आहे. त्याच्या या कर्तृत्त्वामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यशामुळे शुभममध्ये आत्मविश्वास वाढला - शुभम संतोष कोडगिरवारच्या या यशाबद्दल त्याचे खूप कौतुक होत आहे. ज्या मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते, परिस्थितीवर मात करण्याची ज्यांची इच्छा आणि मेहनत करायची तयारी असते, अशा मुलांना आयुष्यात योग्य त्या वेळी मदतीचा हात मिळणे गरजेचे असते. समाजातील दानशूर व्यक्तीचा मदतीचा हात मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटनी मिळू शकते. या यशाबद्दल शाळेचे मुख्याधापक, शिक्षक, शिक्षिका, वृत्तपत्र विक्रेते बंडू अण्णा संगेवार, यांनी शुभमचे अभिनंदन केले.

हेही वाचा - Sanjay Biyani Murder Case : संजय बियाणी हत्याप्रकरणात 12 वा आरोपी अटकेत; तीन जणांवर मोक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.