ETV Bharat / state

शहरातील कत्तलखाना बंद करण्यासाठी मुदखेडकरांचा बंद - कत्तलखाना

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरातील अनधिकृत कत्तलखाना बंद करण्यासाठी आज मुदखेडकरांनी बंद पुकारला. तसेच पालिकाविरोधात मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी हा कत्तलखाना बंद करण्याची मागणी केली.

मोर्चात सहभागी झालेले नागरिक
author img

By

Published : Feb 27, 2019, 1:21 PM IST

नांदेड - मुदखेड शहरातील अनधिकृत कत्तलखाना बंद करण्यासाठी आज मुदखेडकरांनी बंद पुकारला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत मुदखेड पालिकेविरोधात मोर्चा काढला.

मोर्चात सहभागी झालेले नागरिक

मोर्चावेळी शहरातील अनधिकृत कत्तलखाना बंद झालाच पाहिजे, उघड्यावर मास विक्री बंद करा, या घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पालिकेवर धडकला. यावेळी मोर्चेकरांनी पालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. बंदला शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पालिका प्रशासनाचा विरोध करत मोर्चात सहभाग नोंदवला.

शहरात मागील कित्येक वर्षापासून अनधिकृतपणे मुक्या जनावरांचा कत्तलखाना पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे राजरोस पणे चालू आहे, असा आरोप काही नागरिकांनी केला. हा कत्तलखाना मुदखेड शहराच्या मध्यभागी असल्यामुळे कत्तलखान्यात दररोज शेकडो जनावरे अनधिकृतरीत्या कत्तल केली जातात. या कत्तलीमुळे रक्ताचे पाट नाल्यात वाहून शहरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे दुर्गंधीमुळे शहरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, यामुळेच आम्ही आंदोलन करत आहोत, अशी माहिती शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिली.

Intro:मुदखेड शहरातील कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी
मुदखेड बंद; मोर्चा पालिकेवर धडकला....Body:मुदखेड शहरातील कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी
मुदखेड बंद; मोर्चा पालिकेवर धडकला....

नांदेड: जिल्ह्यातील मुदखेड शहरातील अनाधिकृत कत्तलखाना बंद करण्या साठी आज मुदखेड करांनी हजारोच्या संख्येने एकत्रीत येत एकच नारा दिला " मुदखेड शहरातील अनाधीकृत कत्तलखाना बंद झालाच पाहीजे...., उघड्यावर मास विक्री बंदकरा. या घोषनेसह मुदखेड पालिकेवर मोर्चा आज दुपारी १२ वाजता धडकला मोर्चेकऱ्यांचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी स्वीकारले.
कत्तलखाना बंद करण्याच्या प्रमुख  मागणीसह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी पालिका प्रशासनाच्या विरोधात मुदखेड शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या हाकेला शहरातील सर्वच व्यापा -यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून पालिका प्रशासनाचा विरोध करत मोर्चात सहभागी झाले होते.
मुदखेड शहरात मागील कित्येक वर्षापासून अनाधिकृतपणे मुक्या जनावरांचा कत्तलखाना पोलिस प्रशासन व पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे राजरोस पणे चालु असून हा कत्तलखाना मुदखेड शहराच्या मध्यभागी असल्यामुळे कत्तलखान्यात दररोज शेकडो जनावरे अनधिकृतरीत्या कत्तल केली जातात. या कत्तलीमुळे रक्ताचे पाट नाल्याने वाहतात यामुळे भावीकांच्या भावना दुखावल्या जात आहेत एवढेच नाही तर जनावरांच्या या कत्तलीमुळे मुदखेड शहरात दुर्गंधी पसरली असून या पसरलेल्या दुर्गंधीमुळे शहरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पालिकेने या दुर्गंधीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुदखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी हा कत्तलखाना बंद करण्यासाठी मुदखेड पालिकेच्या विरोधात हे आंदोलन केलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.