नांदेड - राज्य शासनाने महानगरपालिकेच्या वाढीव क्षेत्राच्या प्रारूप योजनेचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या शहरा शेजारील गावच्या 235 भूखंडांवर आरक्षण टाकले आहे. या प्रस्तावित आराखड्याला विरोध म्हणून गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या विशेष सभेत शिवसेनेचे नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी सभागृहातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - एमआयएमने 'वंचित'ला 'तलाक' दिल्यानंतर नांदेड उत्तरमधून फेरोज लाला यांच्या उमेदवारीची घोषणा...!
राज्य शासनाने प्रस्तावित केलेला आराखडा रद्द करण्यात यावा, यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर दीक्षा धबाले यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - कुख्यात आकाशसिंगला चंदिगडमधून घेतले ताब्यात; पंजाब पोलिसांच्या सहकार्याने नांदेड पोलिसांची कारवाई
या विकास आराखड्याला सर्वच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. हा आराखडा रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची मागणी लावून धरली. यावर महापौरांनी या विकास आरखड्याविरुद्धचा ठराव शासनाला पाठवण्यात येईल, असेही सभागृहात स्पष्ट केले.