ETV Bharat / state

Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यात दोन्ही गटांचे शक्तिप्रदर्शन, नांदेडवरून मुंबईकडे कार्यकर्ते रवाना - दसरा मेळावा विशेष रेल्वे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या दसरा मेळाव्याला (shiv sena dasara melava) हजर राहण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकत्यांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. (special train for dasara melava). शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या जिल्हाप्रमुखांसह इतर नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते मेळाव्याला घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे.

Shiv Sena Dasara Melava
Shiv Sena Dasara Melava
author img

By

Published : Oct 5, 2022, 10:00 AM IST

नांदेड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या दसरा मेळाव्याला (shiv sena dasara melava) हजर राहण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकत्यांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. (special train for dasara melava). ही रेल्वे १८ डब्ब्यांची असून ती मंगळवारी रात्री 10.15 वाजता सुटणार आहे. याशिवाय ४० चार चाकी वाहनांतून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह: दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी नांदेड मधून हजारो शिवसैनिक या मेळाव्याला न चुकता जातात. परंतु मागील काही दिवसांत शिवसेनेत पडलेली फूट आणि शिवसेना नेमकी कुणाची? यावरून सुरू असलेला न्यायालयीन संघर्ष ह्यानंतरचा हा पहिलाच मेळावा आहे, त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या जिल्हाप्रमुखांसह इतर नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते मेळाव्याला घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे.

अनेक कार्यकर्ते रवाना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी जिल्ह्यातून अधिकाधिक शिवसैनिक उपस्थित रहावेत म्हणून खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. शिंदे गटाकडून नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले होते. ही रेल्वे रात्री शिवसैनिकांना घेऊन मुंबईकडे रवाना झाली आहे. तर काही पदाधिकारी खासगी वाहनातून कार्यकर्त्यांना घेऊन निघाले आहेत. युवा सैनिकांना घेऊन माधव पावडे, महेश खेडकर हे दुपारीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी तीन ट्रॅव्हल्स केल्या असून ते सायंकाळी कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले. प्रकाश मारावार यांनीदेखील ट्रॅव्हल्स केली आहे. हदगाव येथून माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील यांनी त्यांच्या भागातून जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी क्रुझर गाड्यांची व्यवस्था केली आहे.

प्रवास अन् जेवणाचा खर्चही उचलला: शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून अधिकाधिक कार्यकर्ते मुंबईला पोहोचले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही अनेक कट्टर शिवसैनिकांनी या दसरा मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. या शिवसैनिकांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी त्यांचा प्रवास तसेच जेवनाचा खर्च संबंधितांकडून करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.