ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये शीख बांधवांचे व शेतकऱ्याचे आंदोलन

केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर देशभरातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर काल नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Protest
निषेध
author img

By

Published : Dec 8, 2020, 9:43 AM IST

नांदेड - केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात आणि दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड शहरातील शीख बांधवांनी काल (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. समुह हजूरी साध-सांगत श्री हुजूर साहिब नांदेड व शेतकरी समर्थक नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले होते. गुरुद्वारामध्ये अरदास करून शिख बांधव मोर्चाच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले व त्यानंतर धरणे आंदोलन केले. धरणे सुरू असताना सतनाम वाहेगुरूचा पाठ करून शबद गायन करण्यात आले.

केंद्र सरकार व नरेंद मोदींच्या विरोधात घोषणाबाजी -

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला. केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनावर लवकरात लवकर निर्णय घेऊन नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी नांदेडमधील आंदोलकांनी केली.

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी आंदोलन -

दिल्लीत गेल्या बारा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे. नांदेडची धरती ही श्री गुरूगोविंदसिंहजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याच भूमीतून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून देशात समृध्दी व स्थिरता आणावी , अशी मागणी संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी केले.

या आंदोलनावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात महापौर मोहिनी येवनकर, सुखविंदरसिंग हुंदल, राजेंद्रसिंग पुजारी, बोर्डाचे सदस्य गुरमितसिंग महाजन, मनप्रितसिंग कुंजीवाले, विरेंद्रसिंग गाडीवाले, गुरमितसिंग नवाब, भागेंदरसिंग घडीसाज, रविंद्रसिंग मोदी, अवतारसिंग पहरेदार, सुरेद्रसिंग, प्रकाशकौर खालसा उपस्थिती होते.

शेतकरी संघटनांच्या भारत बंदला देशभरातून प्रतिसाद..

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज १३वा दिवस आहे. आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या चर्चांच्या फेरींमधून कोणताही तोडगा समोर आला नाही. यापुढील चर्चेची फेरी ९ डिसेंबरला पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भारत बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. या भारत बंद दरम्यान आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही याबाबत आपण विशेष काळजी घेणार असल्याचे शेतकरी संघटनांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांच्या या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळतो आहे. बरेच विरोधी पक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशननेही आजच्या बंदला पाठिंबा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.