नांदेड : शासन आपल्या दारी कार्यक्रमाची नांदेडमध्ये जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. शहरातील अफजल नगर येथील मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी नागपूर येथील मंडप आला असून त्याची उभारणी सुरू आहे. तब्बल एक लाखाहून अधिक नागरिक या सभेसाठी उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या घरापासून आणून त्यांना परत नेण्याची व्यवस्था ही करण्यात येणार आहे. तब्बल एक लाखाहून अधिक नागरिकांना जेवण व पाण्याची सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
एकाच ठिकाणी मिळणार सरकारी योजना : सरकारच्या योजना गोरगरिबांच्या घरा पर्यंत पोहोचवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. पूर्वी कुठल्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेला सरकारी ऑफिसला जावे लागत होते. परंतु आता मात्र सरकार त्यांच्या घरी जाईल. ज्या काही कृषीच्या योजना असतील, ग्रामविकास योजना असतील, कामगारांच्या असतील किंवा मग आदिवासीच्या असतील, मायनरटीच्या वेगळ्या योजना असतील, आशा अनेक योजना एका प्लॅटफॉर्मवर मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी अभियान सुरू केले आहे. सरकार आपल्या दारी असा अभियान महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चालू केला आहे. या सगळ्या योजना एका प्लॅटफॉर्म खाली याव्यात आणि त्याचा योजनांचा गोरगरीब नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी शासन आपल्या दारी योजना सुरू करण्यात आली आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाची कशी आहे रुपरेषा : या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना घरून आणून त्यांना लाभ देऊन त्यांना घरी पोहोचेपर्यंतची तयारी शासन करीत आहे. अफजल नगर येथील मैदानात भव्य दिव्य असा मंडप टाकण्यात येत आहे. यात एक लाखाहून अधिक नागरिक हजर राहतील अशा मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी मंडप परिसरात शासनाच्या सर्वच योजनांचा स्टॉल लावून नागरिकांना जनजागृती तथा योजनेचा लाभ देण्याच्या उद्देशाने तयारी करण्यात आली आहे. यात तयारीचा आढावा घेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये सभास्थळाची पाहणी केली आहे. कार्यक्रमापूर्वी सभास्थळाची पाहणी खासदार हेमंत पाटील व आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर, महानगर प्रमुख अशोक उमरेकर, महानगर संघटक शिवाजी बोंढारे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा -