ETV Bharat / state

Ashok Chavan : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार आणि आदित्य ठाकरे सहभागी होणार - अशोक चव्हाण - Rahul Gandhi Bharat Jodo Yatra

सात नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नांदेडमध्ये पाच दिवस राहणार आहे. नऊ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार ( Sharad Pawar and Aditya Thackeray) आहेत. आदित्य ठाकरे देखील कदाचित सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan says) दिली.

भारत जोडो यात्रा
Gandhi Bharat Jodo
author img

By

Published : Oct 22, 2022, 10:17 AM IST

Updated : Oct 22, 2022, 10:39 AM IST

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढील महिन्यात नांदेडमध्ये येणार आहे. सात नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नांदेडमध्ये पाच दिवस राहणार आहे. नऊ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार ( Sharad Pawar and Aditya Thackeray) आहेत. आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan says) दिली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सार्वजनिक कामांवरची स्थगिती उठवा : एमआयडीसीच्या जागांवरची स्थगिती उठवली, उद्योजकांना जशी मदत करता तशी सार्वजनिक कामांवरची स्थगिती उठवा. असे माजी मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. राज्य सरकारने एमआयडीसीच्या जागांवरची स्थगिती उठवून उद्योजकांना मदत केली. ही चांगली गोष्ट आहे. पण जिल्ह्या -जिल्ह्यात सार्वजनिक कांमाना दिलेली स्थगिती कधी उठवनार ? असा सवाल माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. राज्य सरकारने अनेक जिल्ह्यातील अनेक विकास कामांना स्थगिती दिली. त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे. सरकारची ही भूमिका चुकीची असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) केली.

प्रतिक्रिया देताना माजी मंत्री अशोक चव्हाण

शेतकऱ्यांना मदत द्यावी : परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारकडे केली आहे. दिवाळीचा आनंदाचा शिधा अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेला नाही, यावर त्यांनी टीका देखील केली. सरकारने नुसत्या घोषणा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली, ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत (Ashok Chavan) होते.

Last Updated : Oct 22, 2022, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.