नांदेड - राजकारणात बंडखोरीमुळे ( Shiv Saina Rebellion ) काही काळ खळबळ माजत असली तरी बंडखोराला त्याचा फार लाभ होत नाही असा दावा नांदेडचे ज्येष्ठ शिवसैनिक धोंडू पाटील यांनी केला. सध्याच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर धोंडू पाटील ( Dhondu Patil ) यांनी नांदेड जिल्ह्यातील बंडखोरीचा आढावा घेतला. जिल्ह्यात शिवसेनेची ( Shiv Sainik ) पाळंमुळं रुजू लागल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी डॉ. डी. आर. देशमुख यांना उमेदवारी दिली. मराठा समाजातील डॉ. देशमुख यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून दिले. १९९५ च्या विधान सभा निवडणुकीत शिवसेनेने सोनार समाजातील प्रकाश खेडकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजातील लोकांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. देशमुख यांनी बंडखोरी करून प्रकाश खेडकर यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली.परंतु शिवसैनिकांच्या अथक परिश्रमामुळे खेडकर विजयी झाले. बंडखोर डॉ देशमुख यांना पराभव पत्करावा लागला.
बंडखोराला लाभ होत नाही - १९९५ साली शिवसेनेशी बंडखोरी करणारे डॉ देशमुख पुन्हा मुख्य राजकीय प्रवाहात कधीच आले नाहीत. शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारे प्रकाश खेडकर सलग दोनवेळा आमदार झाले. २००४ मध्ये तयांचया मृत्यूनंतर खेडकर यांच्या पत्नी अनुसया खेडकर आमदार झाल्या. मराठा समाजातील असूनही डॉ देशमुख केवळ बंडखोरीमुळे राजकारणातून हद्दपार झाले. अल्पसंख्य असलेल्या सोनार समाजातील असूनही केवळ शिवसेनेवरील निष्ठेमुळे खेडकर पतिपत्नी आमदार झाले असेही धोंडू पाटील म्हणाले.
हेही वाचा - Hearing on Shiv Sena's petition : शिंदे गट अपात्र आमदार प्रकरण पुढील सुनावणी १ ऑगस्टला!
माझी खासदारकिची संधी हुकली - 31 मार्च 1996 रंगशारदामध्ये बाळासाहेबांनी मेळावा घेत युती झाली. आनंद दीघे यांनी त्यावेळी सांगितलं कि, आम्ही भाजप सोबत लढणार नाही. 1 एप्रिल 1996 ला सकाळी 11.32 मिनीटांनी सेना भवनात शिवसेने 22 जागा तर, 26 जागा भाजपला असे या युती झाल्याचं सांगितले. 18 नांदेडमधून माझे नाव होते. हि माहिती दिवाकर रावते यांनी दिली. 14 नावाची घोषणा प्रेस कॉन्फेरंस सुरु असताना प्रमोद महाजन आले. त्या पाठोपाठ गोपीनाथ मुंडे आले. बाळासाहेबाला हाथ जोडले. त्यानंतर कसं काय आले प्रमोदजी असे बाळासाहेबांनी विचारल्यावर तुम्ही ठाणे अधिकृत घ्या. त्या बदल्यात मला 2 जागा द्या. त्यानंतर बाळासाहेबांनी सचिवला सांगितले मी 14 नावे दिली आहे. त्यानंतर नांदेड, धुळेची जागा हि शिवसेनेनं दिली. त्यावेळेला माझी खासदारकिची संधी हुकली होती असे धोंडू पाटील म्हणाले.
हेही वाचा - एकनाथ शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव, संपूर्ण शिवसेना काबीज करण्याचा प्रयत्न?