ETV Bharat / state

EXCLUSIVE : पाकिस्तानमधून परतलेली गीता कुटुंबाच्या शोधात आली नांदेडमध्ये - गीता नांदेडमध्ये

जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघाली आहे.

geeta
कुटुंबाच्या शोधात गीता नांदेडमध्ये
author img

By

Published : Dec 14, 2020, 6:39 PM IST

Updated : Dec 14, 2020, 6:59 PM IST

नांदेड - जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघाली आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात गीताच्या कुटुंबाचा शोध घेण्यात येत आहे.

नांदेडचे प्रतिनिधी नागोराव भांगे यांनी घेतलेला आढावा

गीता ही मूकबधीर

पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघाली आहे. दोन दशकांपूर्वी कुटुंबापासून ताटातूट झाल्याने लहानपणीच गीता चुकीने थेट पाकिस्तानात पोहोचली होती. यानंतर २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गीता भारतात परतली होती.

आनंद सेवा सोसायटीकडून गीताची काळजी घेतली जाते

मध्य प्रदेशच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग लोककल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्यानुसार, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या इंदौरमधील आनंद सेवा सोसायटीकडून गीताची काळजी घेतली जाते. या स्वयंसेवी संस्थेवरचा गीताच्या आई वडिलांना शोधण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

गीताच्या हावभावावरून काढावा लागतोय माग

गीताने इशाऱ्याद्वारे आपण राहत असलेल्या भागांसंबंधी काही संकेत दिले आहेत. तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. दरम्यान, गीता ही तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची प्रशंसक आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात.

कुटुंबाला शोधण्यासाठी गीता आज नांदेडमध्ये

त्यामुळे गीताचे कुटुंब हे नांदेड किंवा शेजारील तेलंगाणा परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गीताच्या कुटुंबाच्या शोधात एक पथक आज नांदेडमध्ये आले आहे. गीताला तिच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी इंदौर येथील ज्ञानेंद्र पुरोहित, सुमित्रा मुवेल, जालना येथील राज्यस्तरीय कर्णबधीर संस्थेचे मनोज पटवारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. भारती हे परिश्रम घेत आहेत.

सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा -

पाकिस्तानमधून परतलेली गीता कुटुंबाच्या शोधात; 'ई टीव्ही भारत' सोबतीला

Last Updated : Dec 14, 2020, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.