नांदेड - नायगावमध्ये एका व्यापाऱ्याची 50 हजारांची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - ठाण्यातील 12 लाखांच्या सळईसह चोरीला गेलेला ट्रेलर पोलिसांच्या हाती
नायगावमधील बेळगेनगरमधील रहिवासी व व्यापारी गणेश कोंडावार हे 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे शहरातील मुख्य मार्गावर असलेले योगेश्वर जनरल स्टोअर्स या दुकानाचे कुलूप काढत होते. तेव्हा त्यांनी आपल्या सोबत आणलेली पैशाची बॅग बाजूला ठेवली होती. मात्र, चोरट्यांनी त्यांचे लक्ष चुकवून ही बॅग पळवून नेली. या बॅगेत ५० हजार रुपये होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. याआगोदरही नायगाव शहरात चोरी होण्याचे प्रकार घडले आहेत.
पोलिसांना यावर आळा घालण्याच अपयश येत असल्याने व्यापारी वर्ग संतापला आहे. गणेश कोंडावार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस जमादार कंधारे तपास करित आहेत.
हेही वाचा - भिवंडीत हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या पगाराची ६ लाखांची रोकड चोरीला; आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद