नांदेड - प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. आज सकाळी सहा वाजता सायकल रॅली काढून प्रादेशिक परिवहन विभागाने या अभियानाला सुरुवात केली. विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांम्बोली यांच्याहस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जिलाधिकारी कार्यालय, वजीराबाद चौक, आयटीआय, वर्कशॉप, आनंदनगर मार्गे आयटीआयपर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली होती. या सायकल रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाले, परिवहन विभागाचे अधिकारी शैलेश कामत, अविनाश राऊत, महापालिकेचे उपायुक्त शुभम क्यातमवार यांनी सहभाग घेतला होता.
१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन -
१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान राबवला जाणार आहे. या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी शैलेश कामत यांनी दिली. वाहनधारकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा - मध्य प्रदेशात 'लव्ह जिहाद विरोधी' कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल