ETV Bharat / state

नांदेड उत्तर मतदारसंघात तिकीट कोणाला द्यायचं; महायुतीला पडला प्रश्न

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ म्हणजे अशोक चव्हाण राहतात तो परीसर. सोबतीला तरोडा, पासदगाव आणि लिंबगावचा परिसर मिळून हा मतदारसंघ बनला आहे. या मतदारसंघात अनुसुचित जाती जमातीसह, मुस्लीम मते निर्णायक संख्येने आहेत. नांदेड शहरातील २० प्रभागांचा यात समावेश होतो. ग्रामीणमधून वाडी व लिंबगाव हे दोन जिल्हा परिषद सर्कल आहेत.

नांदेड उत्तर मतदारसंघ: महायुतीसमोर कोणाला तिकीट द्यावं असा प्रश्न
author img

By

Published : Sep 26, 2019, 12:00 PM IST

नांदेड - विधानसेच्या नांदेड शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्रांचा या मतदारसंघात समावेश होतो. शिवसेना-भाजपच्या इच्छुकांची मोठी भाऊगर्दी ईथे पहायला मिळत आहे. हा मतदारसंघ नेमका भाजपचा की शिवसेनेचा हे अद्याप उघड झाले नाही. त्यात नेमकी उमेदवारी कोणाला द्यावी हाही 'प्रश्न' पक्षश्रेष्ठीं समोर आहे. तर काँग्रेसमध्ये मात्र माजीमंत्री डी.पी.सावंत यांची उमेदवारी निश्चित असली तरी वंचितची भूमिकाही तेवढीच महत्वाची ठरणारी आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ प्रकाश खेडकर यांच्या अकाली निधनानंतर कालांतराने काँग्रेसकडे गेला. २००४ साली झालेल्या निवडणुकीत प्रकाश खेडकर यांच्या पत्नी अनुसया खेडकर या एकदा निवडून आल्या होत्या. पण त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या प्रभावाखाली जिल्हा आला. मुख्यमंत्री असताना नांदेड जिल्ह्यातील सर्व जागा आघाडीने जिंकल्या होत्या. २००९ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या डी. पी. सावंत यांना जनतेने बहुमतांनी निवडून दिले. २०१४ साली मोदी लाटेतही अवघ्या काही मतांनी डी. पी. सावंत पुन्हा निवडून येण्यात यशस्वी झाले. आजतागायत आमदार सावंत यांचा जनसंपर्क चांगला आहे. याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना ३० हजारांच्यावर मताधिक्य मिळाले होते. काँग्रेसचा गड कायम ठेवण्यात सावंत सध्यातरी यशस्वी ठरले आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात सावंत आमदार म्हणून फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. अशोक चव्हाणांचे मित्र इतकीच काय ती त्यांची ओळख आहे. स्व:तच्या कार्यशैलीतून एक राजकारणी अशी प्रतिमा त्यांना बनवताच आली नाही. काँग्रेसमधील मोठा वर्ग भाजप-शिवसेनेत गेल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा असाही प्रचार आमदार सावंत यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. तसेच एमआयएम आणि वंचित आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादावरच सावंत यांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ म्हणजे अशोक चव्हाण राहतात तो परिसर. सोबतीला तरोडा, पासदगाव आणि लिंबगावचा परिसर मिळून हा मतदारसंघ बनला आहे. या मतदारसंघात दलीत, मुस्लीम निर्णायक संख्येने आहेत. नांदेड शहरातील २० प्रभागांचा यात समावेश होतो. ग्रामीणमधून वाडी व लिंबगाव हे दोन जिल्हा परिषद सर्कल आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघाप्रमाणेच इथेही सारख्याच समस्या आहेत. पण दक्षिणच्या तुलनेत उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विस्तार झपाट्याने होत आहे. घर बांधुन राहणाऱ्यांची संख्या मतदारसंघात सर्वाधिक आहे. त्यामुळे पाणी टंचाईची तिव्रता या भागात सर्वाधिक आहे. गोदावरीची उपनदी असणारी आसना नदी या मतदारसंघातून वाहते. शहराच्या शेजारी या नदीवर एखादा प्रकल्प उभारला तर शहराच्या पाण्याची गरज भागु शकते. मात्र, पाणी टंचाईच्या या भीषण समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही. उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची चाळणी झालेली आहे. इथली दारू दुकाने वाचवण्यासाठी इथल्या नेतृत्वाने अनेक रस्ते हस्तांतरीत केली आहेत. त्यामुळे रस्त्याची साधी दुरुस्ती देखील शक्य होत नाही.

मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुकांची संख्या सर्वाधीक आहे. भाजपकडून इथ तर इच्छुक असणाऱ्यांची तर रांगच लागली आहे. आरती पुरंदरे, ओमप्रकाश पोकर्णा, बालाजी शिंदे, प्रवीण साले, बंडु पावडे, सुधाकर पांढरे, भगवान आलेगावकर, मिलिंद देशमुख, दीपक पावडे अशी १८ च्यावर यादी आहे. मोठ्या संख्येने विधानसभा लढवणारे दिग्गज असतानाही लोकसभा निवडणुकीत मात्र कुणीही फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, नगरसेवक बालाजी कल्याणकर आदी इच्छुक असून मातोश्रीवर तळ ठोकून आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील कदम, शिला कदम यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडी कडून बालाजी इबीतदार, बाळासाहेब देशमुख, फारुख अहमद उत्सुक आहेत. तर एमआयएम पक्षाच्या वतीने फेरोजलाला यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. त्यामुळे वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारीवर इथल्या निवडणुकीतच चित्र स्पष्ट होणार आहे.

Intro:नांदेड 'उत्तर' मध्ये महायुतीसमोर उमेदवारीचा मोठा 'प्रश्न'.....!

नांदेड: नांदेड शहर व ग्रामीण असे एकत्रित भाग आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेना-भाजपामध्ये मोठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे. नेमका मतदारसंघ भाजपा की शिवसेना हे अजून उघड झाले नाही. त्यात नेमकी उमेदवारी कोणाला द्यावी हाही 'प्रश्न' पक्षश्रेष्ठी समोर आहे. तर काँग्रेसमध्ये मात्र माजीमंत्री डी.पी.सावंत यांची उमेदवारी निश्चित असली तरी एमआयएम व वंचित ची भूमिकाही तेवढीच महत्वाची ठरणारी आहे.
Body:नांदेड 'उत्तर' मध्ये महायुतीसमोर उमेदवारीचा मोठा 'प्रश्न'.....!

नांदेड: नांदेड शहर व ग्रामीण असे एकत्रित भाग आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेना-भाजपामध्ये मोठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे. नेमका मतदारसंघ भाजपा की शिवसेना हे अजून उघड झाले नाही. त्यात नेमकी उमेदवारी कोणाला द्यावी हाही 'प्रश्न' पक्षश्रेष्ठी समोर आहे. तर काँग्रेसमध्ये मात्र माजीमंत्री डी.पी.सावंत यांची उमेदवारी निश्चित असली तरी एमआयएम व वंचित ची भूमिकाही तेवढीच महत्वाची ठरणारी आहे.

मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदार प्रकाश खेडकर यांच्या अकाली निधनानंतर तो कालांतराने काँग्रेसकडे गेला. स्व. खेडकर यांच्या अकाली निधनानंतर २००४ साली झालेल्या निवडणुकीत प्रकाश खेडकर यांच्या पत्नी अनुसया खेडकर ह्या एकवेळ निवडुन आल्या होत्या.
पण त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या प्रभावाखाली जिल्हा आला. मुख्यमंत्री असताना नांदेड जिल्ह्यातील सर्व जागा आघाडीने जिंकल्या होत्या. २००९ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या डी पी सावंत यांना लोकांनी बहुमतांनी निवडून दिले.
२०१४ साली मोदी लाटेतही ही अवघ्या काही मताने डी. पी. सावंत पुन्हा निवडुन येण्यात यशस्वी झाले. आजतागायत आ.सावंत यांचा जनसंपर्क चांगला आहे. याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना ३० हजाराच्या वर मताधिक्य मिळाले. काँग्रेसचा गड कायम ठेवण्यात सावंत सध्यातरी यशस्वी ठरले आहेत. मात्र गेल्या दहा वर्षाच्या काळात डी पी सावंत आमदार म्हणून फारसा म्हणावा प्रभाव पाडु शकले नाही हेही तितकेच सत्य आहे. अशोकरावांचे मित्र इतकीच काय ती त्यांची ओळख आहे, स्व:त च्या कार्यशैलीतुन एक राजकारणी अशी त्यांची प्रतीमा त्यांना बनवताच आली नाही. काँग्रेसमधील मोठा वर्ग भाजपा-शिवसेनेत गेल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा असाही प्रचार आ. सावंत यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. तसेच एमआयएम आणि वंचित आघाडीच्या यशावरच सावंत यांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघ म्हणजे स्व्त: अशोकराव राहतात तो परीसर, सोबतीला तरोडा, पासदगाव आणि लिंबगावचा परीसर मिळुन बनलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दलीत, मुस्लीम निर्णायक संख्येने आहेत. या मतदारसंघात नांदेड शहरातील २० प्रभाग येतात तर ग्रामीणमधून वाडी व लिंबगाव हे दोन जिल्हा परिषद सर्कल आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघाप्रमाणेच इथेही सारख्याच समस्या आहेत. पण दक्षीण च्या तुलनेत उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवीन घर बांधुन राहणा-यांची संख्या या मतदारसंघात सर्वाधिक आहे. त्यामुळे पाणी टंचाईची तिव्रता या भागात सर्वाधिकक आहे, गोदावरी नदीची उपनदी असणारी आसना या मतदारसंघातुन वाहते, शहराच्या शेजारी एखादा प्रकल्प या नदीवर उभारला तर शहराच्या पाण्याची गरज भासु शकते. मात्र पाणी टंचाईच्या या भिषण समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही.
उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची चाळणी झालेली आहे. इथली दारुची दुकाने वाचवण्यासाठी इथल्या नेतृत्वाने अनेक रस्ते हस्तांतरीत केली आहेत. त्यामुळे रस्त्याची साधी दुरुस्ती देखील शक्य होत नाही.
या मतदारसंघात निवडणुक लढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाकडुन इच्छुकांची संख्या सर्वाधीक आहे. भाजपकडुन इथ तर इच्छुकांची रांगच लागलीय. आरती पुरंदरे, ओमप्रकाश पोकर्णा, बालाजी शिंदे, प्रवीण साले, बंडु पावडे, सुधाकर पांढरे, भगवान आलेगावकर, मिलिंद देशमुख, दीपक पावडे अशी १८ च्या वर यादी आहे. मोठ्या संख्येने विधानसभा लढविणारे दिग्गज असतानाही लोकसभा निवडणुकीत मात्र कुणीही फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, नगरसेवक बालाजी कल्याणकर आदी इच्छुक असून मातोश्रीवर तळ ठोकून आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील कदम, शिला कदम यांनी आपली भुमीका उघड केली नसली तरी हे दोघेही त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडी कडून बालाजी इबीतदार, बाळासाहेब देशमुख, फारुख अहमद उस्तुक आहेत. तर एमआयएम पक्षाच्या वतीने फेरोजलाला यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. त्यामुळे वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारीवर इथल्या निवडणुकीच चित्र स्पष्ट होणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.