ETV Bharat / state

नांदेडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्‍मक आदेश जारी - नांदेड प्रतिबंधात्‍मक आदेश जारी

रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी तर सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्‍यात आले आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे.

नांदेड कोरोना
नांदेड कोरोना
author img

By

Published : Apr 5, 2021, 10:50 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे यापुर्वी काढलेल्या आदेशात बदल करुन आता जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध असणार आहे. या आदेशाची आज (सोमवार) ते 30 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी केली जाणार आहे. रात्री 8 वाजतापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी तर सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्‍यात आले आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तु वगळता इतर सर्व प्रकारचे दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिल 2021 बंद राहणार आहेत.

या बाबी राहतील सुरु

  • रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा
  • किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था
  • विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा
  • स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व सेवा
  • स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा
  • मालाची / वस्तुंची वाहतुक, शेतीसंबधित सेवा, ई कॉमर्स
  • मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा
  • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा

हेही वाचा-आता नवा वसुली मंत्री कोण? गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.