ETV Bharat / state

रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रह, सेवेत कायम करण्याची मागणी - permanent service

सिटू कामगार संघटनेअंतर्गत येणारी मजूर संघटनाही या सत्याग्रहात सहभागी आहे. याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष, एसएफआय, किसान सभा, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, किसान ब्रिगेडचे अविनाश टनमने, मराठा सेवा संघानेही पाठिंबा दर्शवला आहे.

agitation
रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रह
author img

By

Published : Jan 28, 2020, 7:57 AM IST

नांदेड - सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी माहूरच्या रेणुकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कुटुंबीयांसह गडाच्या पायथ्याशी बैठा सत्याग्रह सुरू केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून हे कर्मचारी संस्थानसाठी काम करीत आहेत.

रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रह

हेही वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरणी NIA ची टीम परतली रिकाम्या हातांनी.. कागदपत्रे देण्यास पुणे पोलिसांचा नकार

सिटू कामगार संघटनेअंतर्गत येणारी मजूर संघटनाही या सत्याग्रहात सहभागी आहे. या आंदोलनकर्त्यांना संस्थानचे कोषाध्यक्ष आणि तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सोमवारी भेट दिली. येत्या १६ फेब्रुवारीला संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपक धोळकीया गडावर येऊन प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवेत कायम केल्याचे पत्र देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मात्र, आम्हाला तत्काळ या आशयाचे लेखी पत्र द्या, अशी ताठर भूमिका घेवून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे.

हेही वाचा - मुंबई कस्टम विभागाकडून दीड कोटींचे ड्रोन कॅमेरे जप्त

या सत्याग्रहाला प्रहार जनशक्ती पक्ष, एसएफआय, किसान सभा, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, किसान ब्रिगेडचे अविनाश टनमने, मराठा सेवा संघानेही पाठिंबा दर्शवला आहे. मजदूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड, किसान सभेचे कॉ. शंकर सिडाम, कॉ. किशोर पवार, कॉ. अमोल आडे, कॉ. प्रल्हाद चव्हाण, कॉ. राजकुमार पडलवार, कॉ. कालिदास सोनुले, कॉ. मारोती केंद्रे, प्रहारचे तालुकाध्यक्ष अरविंद आडे यांच्यासह आदींनी या सत्याग्रहात सहभाग घेतला आहे.

Intro:सेवेत कायम करा या मागणीसाठी रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रहBody:सेवेत कायम करा या मागणीसाठी रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रह

नांदेड: जिल्ह्यातील माहूर येथील करोडो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थानवर गेल्या पंधरा वर्षांपासून सलग सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी सिटू कामगार संघटना अंतर्गत येणाऱ्या मजदूर युनियन व रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांनी दि. २७ जानेवारी रोजी रेणुकादेवीच्या पायथ्याशी कुटुंबीयांसह बैठा सत्याग्रह सुरु केला आहे.

संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी लागलीच एक वाजता सत्याग्रह स्थळी भेट देवून येत्या १६ फेब्रुवारीला संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपक धोळकीया हे गडावर येऊन प्रत्येक कर्मचा-यांस सेवेत कायम केल्याचे पत्र देणार असल्याचे देणार असल्याने आपण हे आंदोलन मागे घ्यावे अशी त्यांनी आंदोलन कर्त्यांना विनंती केली. मात्र आम्हाला आत्ताच त्या आशयाचे लेखी पत्र द्या अशी ताठर भूमिका घेवून त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निश्चय केला.
कर्मचा-यांची रास्त मागणी लक्षात घेवून प्रहार जनशक्ती पक्ष, एसएफआय, किसान सभा मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, किसान ब्रिगेडचे अविनाश टनमने, मराठा सेवा संघ तालुका उपाध्यक्ष जयकुमार अडकिणे यांनीही या सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेऊन पाठींबा दिला.
यावेळी मजदूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड, किसान सभेचे कॉ.शंकर सिडाम, कॉ.किशोर पवार, कॉ.अमोल आडे, कॉ.प्रल्हाद चव्हाण, कॉ.राजकुमार पडलवार, कॉ.कालिदास सोनुले, कॉ.मारोती केंद्रे, प्रहारचे तालुकाध्यक्ष अरविंद आडे, विक्की मोरे, आकाश कांबळे, रवींद्र पराते, अभिजित देशमुख, अक्षय कोटावार, गणेश डूकरे शँकर चव्हाण, आदर्श विध्वंस, विशाल नरवाडे, प्रफुल कउटकर,कॉ.श्रावण जाधव, कॉ.रामकृष्ण जायभाये, कॉ, अरुण घोडेकर, कॉ.विनोद कदम आदींची उपस्थिती होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.