ETV Bharat / state

Nanded Crime: चुकीचे इंजेक्शन दिल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड येथे घडली आहे. तर प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे मयत विद्यार्थीनीचा मृतदेह तिसऱ्याही दिवशी नातेवाईकांनी ताब्यात न घेतल्यामुळे तो शवागृहात ठेवण्यात आला आहे.

Nanded Crime News
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
author img

By

Published : May 23, 2023, 3:31 PM IST

चुकीचे इंजेक्शन दिल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू

नांदेड: नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील प्रजापती शंकर लांडगे (२०) ही नांदेड शहरातील श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. वर्ग चालू असताना १८ मे रोजी तिला अचानक ताप व चक्कर आली. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने कॉलेजच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार करून चुकीचे इंजेक्शन दिल्याने, ती बेशुध्द पडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Nanded Crime News
चुकीचे इंजेक्शन दिल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू
Nanded Crime News
चुकीचे इंजेक्शन दिल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू

विद्यार्थीनीचा मृतदेह शवागृहात: दरम्यान सदर विद्यार्थीनीला विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. दुसऱ्या दिवशी १९ मे रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या बाबत मयत विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी नांदेड ग्रामीण व वजिराबाद पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी नोंद घेतली नसल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. त्यामुळे नातेवाईकांनी दिलेल्या इशारानुसार प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे मयत विद्यार्थीनीचा मृतदेह तिसऱ्याही दिवशी नातेवाईकांनी ताब्यात न घेतल्यामुळे तो शवागृहातच ठेवण्यात आला आहे.

असा होता परिवार: आई, वडील अतिशय गरीब कुटुंबातील असून ते मोल मजुरी करून मुलीस परिचारिका पदवीचे शिक्षण देत होते. दोन भाऊ व तीन बहिणीचा असा तिचा परिवार आहे. घरातील सर्वात लहान बहीण होती. वडिलांनी व आईने अतिशय हलाखीच्या परिस्थितीत तिला शिकवले. सर्वात जास्त शिकणारी प्रजापती शंकर लांडगे ही अतिशय हुशार होती, पण काळाने घाला घातला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : मयत विद्यार्थीनी संदर्भात तिचा भाऊ शुभम लांडगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या दिवशीही मृतदेह शवागृहात असून संबंधितावर कारवाई करावी, या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे शुभम लांडगे यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले.

चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा मृत्यू झाला. प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही - शुभम लांडगे

उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू: जिल्हा शल्य चिकित्सक नीलकंठ भोसीकर यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात कुमारी प्रजापती शंकर लांडगे यांच्यावर नांदेड शहरातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती, सिव्हिल सर्जन यांनी दिली. उपचारादरम्यान त्यांना उलट्या होऊ लागल्याने अंगात कफ जमा झाला. रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

चौकशी करून कारवाई: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यामध्ये कोणी दोषी असल्यास तत्काळ चौकशी करून कारवाई करून जिल्हा प्रशासनाला अहवाल द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केले आहेत. याप्रकरणी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्यावतीने तपास करण्यात येणार असल्याची माहिती सिव्हिल सर्जन नीलकंठ भोसीकर यांनी दिली आहे.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यामध्ये कोणी दोषी असल्यास तत्काळ चौकशी करून कारवाई करून जिल्हा प्रशासनाला अहवाल द्यावा - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

चुकीचे इंजेक्शन दिल्याचा नातेवाईकांचा आरोप: गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चौथा दिवशी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. परिवारातील सदस्य व अनेक सामाजिक संघटना आज नांदेड मध्ये मोर्चा काढत शासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच प्रजापती हिच्या मृत्यूला रुग्णालयातील संबंधित डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तीन ते चार चुकीचे इंजेक्शन दिले. त्यामुळे तिला रक्ताच्या उलट्या देखील झाल्या. दरम्यान, संबंधित डॉक्टरांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, मयत तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. या मागणीसाठी मयत तरुणीच्या नातेवाईकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा -

  1. Food Poisoning News कंदुरी बेतली जीवावर कंदुरी जेवणातून 27 जणांना विषबाधा रुग्णांवर उपचार सुरू
  2. Food Poisoning पाणीपुरी खाणे पडले महागात तब्बल 57 जणांना विषबाधा
  3. Pistols Seller Arrested In Nanded पिस्तुल विक्रीसाठी आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले गावठी कट्ट्यांसह तिघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.