नांदेड - जिल्ह्यातील नऊही विधानसभा मतदारसंघात सरासरी ६७ टक्के मतदान झाले. सांयकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्यक्षात सरासरीच्या 64 टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतरही मतदानासाठी मतदार मोठ्या संख्येने रांगेत असल्याने हा आकडा सरासरी ६७ टक्क्याच्या आसपास जाईल असा अंदाज आहे. दरम्यान, सर्वाधिक मतदान हे भोकर मतदारसंघात नोंदवले गेले आहे. सरासरीच्या ७५ टक्क्यांहूनही अधिक मतदान होईल असा अंदाज आहे.
हेही वाचा - बीडमध्ये बोगस मतदारांवरुन राडा, मतदारांना अडवून दमदाटी
नांदेड जिल्ह्यात सोमवारी सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी दुपार नंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे दुपारनंतर सर्वत्र मतदारांचा उत्साह दिसून आला. सांयकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात अनेक जागी मतदार मतदान केंद्राच्या रांगेत आहेत, या सर्वांचे मतदान करून घेतल्या जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सहा वाजेपर्यंत झालेल्या सरासरीच्या ६४ टक्के मतदानात काही अंशी वाढ होऊ शकते. दरम्यान, मतदारांचा सर्वाधिक उत्साह हा भोकर मतदारसंघात दिसून येत आहे. निवडणूक अधिकाऱ्याच्या अंदाजानुसार भोकर मतदारसंघात ७५ टक्के पेक्षाही जास्त मतदान नोंदवले जाऊ शकते. त्यामुळे भोकरच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा - राज्यात हवा बदलली आहे ..असं फक्त पवारानांच वाटते, चंद्रकांत पाटलांचा टोला