नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन 9 लाख 75 हजार 136 रुपये मुख्यमंत्री सहायता निधी करता देण्यात आले. मदतीचा धनादेश कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या वेळी विद्यापीठात चालू असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली.
कोविड -19 साथ रोग नियंत्रण कामात मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना निधी देण्याचे आवाहन केले होते. त्या नुसार विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मार्च महिन्याच्या वेतनातील एका दिवसाचे वेतनाचा 9 लाख 75 हजार 136 रुपयांचा धनादेश चव्हाण यांच्याकडे भोसले यांनी सुपूर्द केला. या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयानां आवाहन -
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षेत्रातील सर्व महाविद्यालयातील शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचारी यांनी ही मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.