ETV Bharat / state

Raju Shetti : विमा कंपनीत मोठे स्कॅंडल; राज्यासह केंद्रातील उच्च पदस्थ सहभागी - राजू शेट्टी

शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी(FRP) मिळत नाही. विमा कंपनी दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीवर, शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारत आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केली आहे.

Raju Shetti
राजू शेट्टी
author img

By

Published : Nov 10, 2021, 10:00 PM IST

Updated : Nov 10, 2021, 10:18 PM IST

नांदेड - इंधनाच्या किंमतीत दररोज वाढ होत आहे, शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी(FRP) मिळत नाही. विमा कंपनी दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीवर, शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारत आहे. शेतकऱ्यांच्या व‌‌ नागरिकांच्या समस्यांवरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच केंद्र व राज्य सरकार आर्यन खान, समीर वानखेडे प्रकरणे प्रसारमाध्यमांना हाताशी धरून चालवले जात आहेत. महाविकास आघाडीसोबत राहण्याचा फेरविचार राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‌ नेते व माजी खासदार राजू शेट्टी ( Swabhimani Shetkari Sanghtana President Raju Shetti) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. विमा कंपनीत खूप मोठे स्कॅंडल असून, यात राज्यातील व केंद्रातील उच्च पदस्थ आहेत, असा आरोपीही शेट्टी यांनी केला.

माहिती देताना राजू शेट्टी

पार्डी म. येथे शेतकऱ्यांची भेट -

अर्धापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता‌ पार्डी येथील शेतकऱ्यांच्यावतीने गंगाधरराव देशमुख यांच्या मळ्यात ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा - केंद्र सरकार अन् राज्य सरकारमध्ये राजकीय टोळी युद्ध सुरू - राजू शेट्टी

विमा कंपनीत मोठा भ्रष्टाचार -

हा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, विमा कंपनी ‌‌‌‌‌‌‌‌ही शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही. पिक कापणी पद्धत सदोष आहे. त्यामुळे उंबरठा उत्पन्न चुकीचे येते. या कंपनीत खूप मोठा भ्रष्टाचार आहे. आम्ही वेळोवेळी आवाज उठवला आहे. विमा कंपनीचा गैरकारभार लवकरच बाहेर काढण्यात येईल.

एफआरपी चार टप्पात देणे चुकीचे -

जातीयवादी भाजपचे सरकार येवू नये म्हणून आम्ही महाआघाडी सोबत गेलोत. केंद्रातील भाजपा सरकार व राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या व ‌‌‌‌‌‌नागरिकांच्या समस्यांना बगल देत आहे. या दोन्ही सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांना ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार टप्प्यांत एफआरपी देणे चुकीचे आहे. कारखानदार ऊस व‌ साखरेची चोरी करतात, असा आरोप‌ शेट्टी यांनी केला. त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश पोफळे, रवीकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, हरिभाऊ कोंढेकर, किशनराव देळुबकर, आदी होते. यावेळी सदाशिवराव देशमुख, गंगाधरराव देशमुख, विठ्ठलराव देशमुख, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मारोतराव भांगे, दादाराव शिंदे, पंजाबराव देशमुख, शेकुराव हापगुंडे, माजी सरपंच निळकंठ मदने, हनुमंत देशमुख, नंदू देशमुख, अनिल देशमुख व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा - एक रकमी एफआरपी न देणारे साखर कारखाने चालू देणार नाही :राजू शेट्टी

Last Updated : Nov 10, 2021, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.