नांदेड - सोलापूर विभाग, मध्य रेल्वेमधील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण झाले आहे. भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर रेल्वे गाड्या धावण्याकरिता इतर तांत्रिक कार्य करण्याकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे बऱ्यांच रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे.
१८ फेऱ्या रद्द
सोलापूर विभागाने कळविल्यानुसार नांदेड रेल्वे विभागातील नांदेड-पनवेल-नांदेड या विशेष गाडीच्या १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पवनेल विशेष गाडी दिनांक १४ मार्च ते ३१ मार्च, २०२१दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
- गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी दिनांक १५ मार्च ते ०१ एप्रिल, २०२१दरम्यान रद्द करण्यात आली आहे.