ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : हातात मशाल घेत राहुल गांधी महाराष्ट्रात, म्हणाले 'कोणतीच शक्ती रोखू शकणार नाही' - भारत जोडो यात्रा

'भारत जोडो यात्रा'ला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. यात्रा फक्त श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये थांबेल आणि आम्ही तिथे तिरंगा फडकावू. देशाला जोडणे हा यात्रेचा उद्देश आहे असे काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रा नांदेड मध्ये दाखल झाल्यावर ते तेथे बोलत होते. (bharat jodo yatra in maharashtra)

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Nov 7, 2022, 10:28 PM IST

Updated : Nov 8, 2022, 7:14 AM IST

नांदेड: 'भारत जोडो यात्रा'ला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. यात्रा फक्त श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये थांबेल आणि आम्ही तिथे तिरंगा फडकावू. देशाला जोडणे हा यात्रेचा उद्देश आहे असे काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रा नांदेड (bharat jodo yatra in maharashtra) मध्ये दाखल झाल्यावर ते तेथे बोलत होते.

नांदेड जिल्ह्यात चार मुक्काम: भारत जोडो यात्रा ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात असणार आहे. जिल्ह्यात राहुल गांधींचे चार मुक्काम असणार आहे. नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर १० नोव्हेंबर रोजी या यात्रेतील राज्यातील पहिली सभा होईल. या सभेला काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • Nanded, Maharashtra | No force can stop the 'Bharat Jodo Yatra' in between. The yatra will only stop in Srinagar, J&K and we will hoist the tricolour national flag there. The aim of the yatra is to unite the country: Congress MP Rahul Gandhi pic.twitter.com/48m3wG26X5

    — ANI (@ANI) November 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रात अशी असेल भारत जोडो यात्रा - भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमण करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सहभागी होणार होणार आहे.

  • छत्रपति शिवाजी महाराज के साहस की प्रतीक, देश की एकता की ये मशालें, आने वाले भविष्य के लिए एक मिसाल बन जाएंगी।🇮🇳

    नमस्कार महाराष्ट्र 🙏 pic.twitter.com/bYSA9Izmj1

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधींसाठी खास भोजन - राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील 'भारत जोडो यात्रेचा' नांदेडमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या भोजनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेले खाद्यपदार्थ या भोजनात असतील. यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

Last Updated : Nov 8, 2022, 7:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.