नांदेड - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पाल्यांना दत्तक घेण्याचा निर्णय पुरुषोत्तम धोंडगे यांनी घेतला आहे. कोरोना काळात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेकांपुढे मुलांच्या संगोपणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. मात्र पुरुषोत्तम धोंडगे यांच्या उपक्रमामुळे छत्रछाया हरवलेल्या मुलांना आधार मिळणार आहे.
भाई केशव धोंडगे यांच्या जन्म शताब्दी निमित्त विविध उपक्रम-
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसेनानी भाई डॉ. केशवराव धोंडगे यांच्या जन्म शताब्दी निमित्त विविध उपक्रम घेतले जात आहेत. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी ही माहिती दिली. कोविड लसीकरण घेतलेले राज्यात सर्वात जास्त वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून भाई धोंडगे यांनी ऐतिहासिक नोंद झाली आहे. राज्याच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ विधिमंडळ सदस्य म्हणून भाई केशवराव धोंडगे यांची ओळख आहे. त्यांचं वय १०२ वर्ष आहे. १९५७ पासून ते १९९५ पर्यंत ते विधिमंडळ सदस्य होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीती पूर्वी विधिमंडळाचे भाई धोंडगे सदस्य ( १९५७) होते आता. समकालीन मोजकेच माजी सदस्य असावेत. या काळात त्यांना खासदार म्हणून निवडून आले आहेत. राज्याच्या ११ मुख्यमंत्र्यासोबत काम करणारे ते राज्यातील एकमेव माजी आमदार आहेत. त्यांच्या जन्म शताब्दी निमित्त कोरोना रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात आहेत.
कोरोना काळात अन्नदान-
कोरोना काळात लागलेल्या लोकडाऊनमुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. या काळात एकीकडे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तर दुसरीकडे वाहतूक व्यवस्था बंद असल्याने नातेवाईकांना रुग्णांपर्यंतन पोहचण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले होते. अश्या काळात पुरुषोत्तम धोंडगे यांनी भाऊचा डब्बा हा उपक्रम सुरू केला. माजी खासदार भाई केशव धिंडगे यांच्या जन्मशताब्दी निमित्त भाऊचा डब्बा सुरू केल्याचं पुरुषोत्तम धोंडगे यांनी सांगितलं.
कोरोना काळात निराधार झालेल्या पाल्यांना घेणार दत्तक-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना आजारामुळे अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. त्यांची आकडेवारी मोठी आहे. यामुळे कुटुंबातील मुलांचे भविष्य अंधकारमय झालं आहे. अशा एक हजार मुलांना मुलांना दत्तक घेण्याचा निर्धार पुरुषोत्तम धोंडगे यांनी घेतला आहे. त्यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण आणि इतर खर्च श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी केला जाणार आहे. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अनाथांना एक आधार मिळणार आहे.