नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून देशभर टाळेबंदी करण्यात आली. या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. नाशवंत फळे, भाजीपाला पिकवणा्र्या शेतकर्यांना तर उत्पादन खर्च न निघाल्यामुळे मोठी किंमत मोजावी लागत आहे. तालुक्यातील काशीफळ उत्पादक शेतकर्यांना काशीफळ उकिरड्यावर आणि जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे. उत्पन्न सोडाच पण लागवडी खर्चही निघाला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात काशीफळाने शेतकर्यांना जीवंतपणी काशी दाखवली आहे.
हे फळ केवळ भाजीसाठी उपयोगी असल्यामुळे विक्रीवर मर्यादा येतात. अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, पार्डी आदी परिसरात सुमारे 400 ते 500 एकरवर यंदा काशीफळाची लागवड करण्यात आली आहे. या पिकला लागवडी खर्च सरासरी 20 ते 30 रुपये येतो. तर सरासरी 500 ते 700 भाव प्रतिक्विंटल भाव मिळतो. यंदा चांगल्या प्रतीची फळे आली. मात्र विक्रीच न झाल्याने शेतकर्यांना खूप मोठा अर्थिक फटका बसला आहे.
जिवंतपणीच दाखवली काशी!
टरबुज पिकाला पर्यायी पीक म्हणून काशिफळ या पिकाची लागवड केली. मोठा खर्चही केला. पण उत्पादन खर्चही निघाला नाही. नावाप्रमाणे या फळाने शेतकऱ्याची काशी केली. अशी खंत शेतकरी गजानन देशमुख पार्डीकर यांनी व्यक्त केली. तसेच काशीफळ उत्पादकांना कोरोनामुळे खूप मोठा अर्थिक फटका बसला आहे. उत्पादन खर्च ही निघाला नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी गजानन देशमुख पार्डीकर यांनी केली आहे.
या पीडित शेतकर्यांकडे शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष नाही. झालेल्या नुकासणीचे तात्काळ सर्वेक्षण करून अर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.