नांदेड - राज्यांना कमीतकमी अधिकार असावेत त्यामुळे फुटीरता वाढत नाही. कलम ३७० रद्द केल्यामुळे आता काश्मीरमध्येही इतर राज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल. देशात एकसंघता निर्माण होऊन सदरील राज्याच्या विकासाला चालना मिळेल, असे मत इतिहास तज्ञ प्रा.डॉ. शेषराव मोरे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केले आहे.
प्रा.डॉ. शेषराव मोरे यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे :
- कलम ३७० रद्द केल्यामुळे आता तिथे इतर राज्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल. देशात एकसंघता निर्माण होईल.
- काश्मीरमध्ये असणारे अनेक कायदे रद्द होतील. काश्मीरच्या सर्वांगीन विकासाला चालना मिळेल.
- सुरूवातीला काश्मीरची जनता विरोध करतील पण नंतर त्यांना याचा फायदा समजून येईल.
- सध्या काही दिवस थोडे विरोधी पडसाद उमटतील पण भविष्यात त्याठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल.
- भांडवलदारही त्या ठिकाणी गुंतवणूक करून नवीन उद्योग व कारखाने आणू शकतील. यामुळे बेरोजगारी कमी होईल.
- काश्मीर प्रश्नात इतर कुणीही मध्यस्थी करून उपयोग नाही. त्या भागातील जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत.
- संयुक्त राष्ट्र संघामध्ये अगोदरच हा विषय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर यात आपलीच बाजू भक्कम आहे.
- काश्मीर भारतात राहणे आवश्यक होते आणि आहे. यासाठी कलम ३७० हटवणे आवश्यक होते.