ETV Bharat / state

कंधारमध्ये विचित्र अपघातात १४ जखमी ; लक्झरी बसचे ब्रेक निकामी झाल्याने घडला अपघात

खाजगी बस चालकाने प्रसंगावधान ओळखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

author img

By

Published : Mar 13, 2020, 12:57 AM IST

Private Bus accident in Kandhar due to break fail
कंधारमध्ये विचित्र अपघातात १४ जखमी ; लक्झरी बसचे ब्रेक निकामी झाल्याने घडला अपघात

नांदेड - लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसचे ब्रेक निकामी झाल्याने कंधारात विचित्र अपघातात होऊन 14 जखमी झाले. त्यापैकी 7 लोकांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले आहे. लक्झरी बसच्या चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

१२ मार्चला सायंकाळच्या सुमारास कंधार येथील मंगल कार्यालयातून लग्नाचे वऱ्हाडी घेवून निघालेल्या खाजगी (लक्झरी) बस क्र.एम.पी.४१,एम.पी.९९११ शहरातून निघाली होती. समोर मुखेड आगाराची बस क्र. एम.एच १४ ,बी.टी.२४१६ कंधार आगारात येत असताना रस्त्यातच तिला लक्झरी बसने समोरुन धडक दिली. तरीही ब्रेक लागले नसल्याने लक्झरी शहरातील महाराणा प्रताप चौकात जावून धडकल्याने दुभाजक तोडून चौक आवारात घुसली.

हेही वाचा -अर्धापूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

विशेष म्हणजे कंधार शहरात हाजी सय्याह सरवरे मगदुम यांच्या उर्स जत्रा व संदल मिरवणूक असल्याने शहरात मोठी गर्दी होती. खाजगी बस चालकाने प्रसंगावधान ओळखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान 2 मोटार सायकल, ट्रक्टर, टाटा सुमो या वाहनास धडकत लक्झरी गेल्याने 7 जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. तर, बाकी ७ जणांवर कंधार येथिल ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

गंभीर पैकी बबन रामचंद देवकते, (वय ३७) रा.मंडलापुर तालुका मुखेड,जि.नांदेड, माणिक गोविंदराव शेटकर (वय-४२ ) रा.गंगनबिड ता.कंधार, रामराव सोनबा मदयबोईनवाड (वय-४५) रा.गंगनबीड ता.कंधार, सागरबाई चंद्रकांत केंद्रे (वय-३५) रा.गोलेगाव ता.कंधार,अल्ताफ शेख लतीफ रा.नांदेड), अब्दुल हाफिज अब्दुल रशीद (वय-५७) रा.कंधार, नागनाथ सोमनाथ जागीरदार (वय-४०) रा.कंधार हे गंभीर जखमी असल्याने नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

हेही वाचा -नांदेडमध्ये भीषण आगीत घर भस्मसात, दोघे भाजले

तर, व्‍यंकटी संभाजी गोटमवाड (रा.वाघी, ता.नांदेड ), यादव गोविंद पलकमवाड (वय-५०) रा.पेनुर ता. लोहा, सलमान खान रियाज खान (वय-२६) रा.कंधार, शेख सत्तार रफीयोददिन छोटी गल्ली कंधार, शंकर भोजू जाधव (वय-४०) रा.कंधार, संजय लक्ष्‍मण नागलवाड (वय-३५) रा.कंधार, सारजाबाई यादव पलकमवाड (वय-५०) रा.पेन्नूर आदी सात जणांवर कंधार येथे उपचार चालू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.