ETV Bharat / state

बिलोली तालुक्यातील प्रेमीयुगुलाची मन्याड नदीत उडी घेऊन आत्महत्या - premiyugul suicide biloli

बिलोली तालुक्यातील केरुर येथील एका तरुणीचे नायगाव तालुक्‍यातील किन्हाळा येथील एका तरुणासोबत प्रेम होते. मात्र, सदरील तरुणीचे गेल्या काही दिवसापूर्वी अन्य ठिकाणी लग्न करण्यात आले. आपल्या प्रियकरापासून दूर झाल्याचे दुःख दोघांच्या मनात होते. त्यात ती नुकतीच माहेरी आली होती.

death body
मृत प्रेमीयुगुल
author img

By

Published : Jun 24, 2020, 12:29 AM IST

बिलोली (नांदेड) - एका प्रेमीयुगुलाने मन्याड नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यातील तरूणी ही केरुर येथील तर तरूण हा नायगाव तालुक्यातील किन्हाळा येथील होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बिलोली तालुक्यातील केरुर येथील एका तरुणीचे नायगाव तालुक्‍यातील किन्हाळा येथील एका तरुणासोबत प्रेम होते. मात्र, सदरील तरुणीचे गेल्या काही दिवसापूर्वी अन्य ठिकाणी लग्न करण्यात आले. आपल्या प्रियकरापासून दूर झाल्याचे दुःख तिच्या मनात होते. यामुळे ते दोघेजण अस्वस्थ होते. त्यात ती नुकतीच माहेरी आली होती.

मंगळवारी ही युवती आणि किन्हाला येथील तिचा प्रियकर यांनी पहाटे देगलूर रस्त्यावरील वझरगाव येथील मन्याड नदीच्या पुलावरून नदीच्या पाण्यात उडी घेतली. यावेळी दोघांनी एकमेकाला घट्ट बांधून घेतले होते. शेवटची घटका एकमेकांच्या मिठीत घालत दोघांनीही या जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा - परिस्थिती आटोक्यात आल्याशिवाय कोणतीही शाळा सुरू होणार नाही - अजित पवार

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.