नांदेड - ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विवाहितेचा गर्भपात झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये पन्नास लाखांच्या गुटख्यासह ट्रक जप्त, विमानतळ पोलिसांची कारवाई
हडको येथील एका विवाहितेला सासरचे तू दिसायला चांगली नाहीस, म्हणून वेळोवेळी हिनवत तिचा मानसिक छळ करत. मात्र, दोन दिवसांपूर्वी पीडित विवाहिता घर काम करत असताना अचानकपणे सासू व नवऱ्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत पीडित विवाहिता बेशुद्ध पडली असता तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर विवाहितेच्या माहेरच्यांना याबाबात कळविण्यात आले.
हेही वाचा - अर्धापूर-मालेगाव महामार्गावर स्कूल बसचा अपघात; एकाचा मृत्यू, सहा जखमी
या मारहाणीत गर्भवती असलेल्या पीडित विवाहितेचा गर्भपात झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
हेही वाचा - नांदेड-औरंगाबाद-नांदेड नवीन विशेष रेल्वेगाडी सुरु होणार