ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या- जिल्हाधिकारी - नांदेड जिल्हा लेटेस्ट न्यूज

सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात मागील सहा वर्षांपासून सुरूच आहे. या काळात नांदेडमध्ये एकूण ९३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये एकूण ७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सहा वर्षांत प्रथमच शेतकरी आत्महत्यांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या

author img

By

Published : Jan 2, 2021, 7:38 PM IST

नांदेड - सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात मागील सहा वर्षांपासून सुरूच आहे. या काळात नांदेडमध्ये एकूण ९३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये एकूण ७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सहा वर्षांत प्रथमच शेतकरी आत्महत्यांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

17 वर्षांपासून शेतकरी आत्महत्या

नांदेड जिल्ह्यात मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासून वाढ झाली. सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्ज यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतत चार वर्ष दुष्काळाचा सामना केला. शेतात पीक उगवले नाही, त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. याला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

७७ पैकी ६६ घटना मदतीसाठी पात्र

जिल्ह्यात गेल्या वर्षी 77 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी 65 घटना या मदतीसाठी पात्र ठरल्या असून, 8 घटना या अपात्र ठरल्या आहेत. तर उर्वरीत चार प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. पात्र ठरलेल्या 65 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सकारात्मक वातावरणाचा परिणाम- जिल्हाधिकारी

शासन तसेच जिल्हा प्रशासनस्तरावर शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्न होत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता वाढत आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, प्रशासन शेतकऱ्यांसोबत आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले आहे.

वर्ष निहाय शेतकरी आत्महत्या
७७ (२०२०)
१२२ (२०१९)
९८ (२०१८)
१५३ (२०१७)
१८० (२०१६)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.