नांदेड - कंधार तालुक्यातील गऊळ येथे पुतळा बसवण्याचा कारणावरून पोलीस व ग्रामस्थांमध्ये प्रचंड राडा झाला. कंधार तालुक्यातील गऊळ येथे ग्रामपंचायतीच्या जागेवर महापुरुषाचा पुतळा बसवण्याच्या कारणावरून पोलीस व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची होऊन प्रचंड राडा झाला. प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
हे ही वाचा - OBC Reservation : राज्य सरकार तयार करणार इंपिरिकल डेटा; सर्वपक्षीय बैठकीत एकमत
उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांच्या उपस्थितीत पुतळ्याची संरक्षण समिती स्थापण करण्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी मोठा फौजफाटा नेत लाठीमार करत पुतळा हटवल्याने गऊळ गावात मोठा तणाव निर्माण झाला. याप्रकरणी ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून कलम ३५३, ३३२, १४५, १४७, ३३६, १४८, १४९, १८८, ५०४, ३०५ नुसार १३ जणांसह इतर २०-२५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास एपीआय लोणीकर करत आहेत.
हे ही वाचा - ओबीसींच्या इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार - छगन भुजबळ
घरात घुसून पोलिसांकडून मारहाण झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप -
या पुतळ्याच्या जागेच्या वादावरून पोलीस प्रशासनाने गऊळ गावात घरात घुसून पुरुष व महिलांना मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कंधार तालुक्यामध्ये घडलेल्या या पुतळा प्रकरणावरून पोलीस व नागरिक यांच्यात वाद निर्माण होऊन पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला. त्यामुळे गावातील वातावरण बिघडले असून गावास छावणीचे रूप आले आहे.