नांदेड - शालेय पोषण आहारात प्लॅस्टिकयुक्त तांदळाचे मिश्रण असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघड झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यातील कोसमेट गावाच्या शाळेत हा प्रकार आढळला आहे. मुलाने शाळेतून आणलेले तांदूळ पालकाने पाहिले असता हा प्रकार उघड झाला आहे.
तांदळाचे नमुने पाठवले -
पालकांच्या तक्रारीनंतर पंचायत समितीच्या पथकाने शाळेत येऊन तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली.
किनवट तालुक्यात खळबळ
तांदळात नेमके प्लॅस्टिकचे मिश्रण आहे की अन्य कशाचे ते तपासणी नंतर कळणार आहे, मात्र पोषण आहारात मिश्रण आढळल्याने किनवट तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुंबई इथल्या स्टेट को ऑपरेटिव्ह कंझुमर फेडरेशनतर्फे पोषण आहाराचे वाटप होत असते, या एजन्सीने याबाबत मात्र अद्याप काहीही खुलासा केलेला नाही.
हेही वाचा - राज्यातील हे २५ जिल्हे निर्बंधमुक्त होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वपूर्ण घोषणा