नांदेड - जिल्ह्यातील माहूर येथे भाजपसह विविध हिंदू संघटनेच्या आणि संत महात्माच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा बुधवारी दत्त चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी विविध साधू, संत व हिंदू संघटनांनी भाविकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदवला.
भारतीय नागरिकता संशोधन विधेयक राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात देशभरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी हे विधेयक देशातील सर्वधर्मसमभाव जपणारा नसून समाजात तेढ निर्माण करणारा असल्याचे म्हणत कायद्याला विरोध केला जात आहे. तर, दुसरीकडे या कायद्याच्या समर्थनार्थ देखील जनता पुढे येत आहे. माहूरमध्येही भाजप आणि विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत बुधवारी या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची यात उपस्थिती होती.
हेही वाचा - ... म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात भरवली शाळा
माहूर येथे ७ दिवसांपूर्वी ५१ कुंडीय दत्तयाग यज्ञ व धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या सप्ताहाचा शेवट बुधवारी करण्यात आला. भारतीय नागरीकता संशोधन विधयकाच्या समर्थनार्थ या सप्ताहातील साधू, संत व भाविकसुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमाफीच्या जीआरची केली होळी