ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघात तिरंगी-चौरंगी लढती...युती-आघाडीपुढे बंडखोरीचे आव्हान

जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण, अलीकडच्या काळात भाजप-शिवसेनेचे बळ वाढल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बरीच कसरत करावी लागणार आहे. तर, दुसरीकडे युतीचे बळ वाढले असले तरी लोकसभेसारखी स्थिती जिल्ह्यात नाही.

नांदेड
author img

By

Published : Oct 9, 2019, 10:01 AM IST

नांदेड - जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण, अलीकडच्या काळात भाजप-शिवसेनेचे बळ वाढल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बरीच कसरत करावी लागणार आहे. तर, दुसरीकडे युतीचे बळ वाढले असले तरी लोकसभेसारखी स्थिती जिल्ह्यात नाही. विधानसभा निवडणुकीत सरकारवर असलेल्या नाराजीचा फटका यावेळी भाजप-सेनेला बसणार आहे. काँग्रेसनेही पराभवाचे चांगलेच मनावर घेतले असून गतवेळेपेक्षा यावेळी चांगलीच तयारी केल्याचे दिसून येत आहे. तसेच युती-आघाडी पुढे बंडखोरीचे आव्हान आहे.

हेही वाचा - शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही

भोकर-
भोकर मतदारसंघातून यावेळी खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मैदानात असून गेल्या दोन महिन्यांपासून मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तर, दुसरीकडे यावेळी भाजपनेही त्यांच्या विरोधात माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर सारखा तगडा उमेदवार मैदानात उतवरले आहे. अशोक चव्हाण यांना मतदारसंघातच गुंतवून ठेवण्यात भाजप सध्यातरी यशस्वी ठरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नामदेव आयलवाड हे आपले नशीब अजमावत आहेत. मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून सात उमेदवार रिंगणात आहेत.

लोहा-कंधार -
-खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे. पण, भाजपला हा मतदारसंघ सोडवून घेण्यात ते अपयशी ठरले आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. शिवसेनेकडून अँड.मुक्तेश्वर धोंडगे रिंगणात आहेत. खासदार चिखलीकर यांचे मेहुणे भाजपचे श्यामसुंदर शिंदे यांनी बंडखोरी करत शेकापच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीने नवा चेहरा दिला असून दिलीप धोंडगे यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे शिवा नरंगलेही आपले नशीब अजमावत आहेत. खासदार चिखलीकर यांचे वजन युतीच्या की मेव्हण्याच्या पारड्यात पडेल. यावर येथील स्थिती बरीच अवलंबून आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत असून १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा - 'पालकमंत्रीपद काय असते, हे न कळणारी व्यक्ती म्हणजे परिणय फुके'

नांदेड दक्षिण
राज्यात सर्वात जास्त ३८ उमेदवार या मतदारसंघातून रिंगणात आहेत. जिल्ह्यात भाजप-शिवसेना एकदिलाने ही निवडणुकीची लढाई लढतील अशी चिन्हे दिसत नाहीत. खुद्द भाजपचे महानगराध्यक्ष यांनी राजीनामा देऊन बंडखोरी केली आहे. तर, युतीकडून राजश्री पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने नवीन चेहरा दिला असून मोहनराव हंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने फारुख अहमद यांना उमेदवारी दिली आहे. एमआयएमने काँग्रेसमधून प्रवेश केलेले नगरसेवक साबेर चाऊस यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात पंचरंगी लढत होण्याची चिन्हे असून कोणामुळे-कोणाची सीट धोक्यात येईल की लाभ होईल हे चित्र सध्यातरी स्पष्ट नाही.

नांदेड उत्तर झपाट्याने या मतदारसंघात वस्ती वाढ होत आहे. भाजप-शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी येथून तयारी सुरू केली होती. शिवसेनेच्या एका कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडून नगरसेवक बालाजी कल्याणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून माजी मंत्री डी. पी.सावंत हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून मुकुंद चावरे हे निवडणूक लढवत आहेत. एमआयएमकडून फेरोजलाला हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकंदरीत या मतदारसंघात चौरंगी लढत असून २४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

नायगाव
नायगाव मतदारसंघात तिसऱ्यांदा काँग्रेसकडून आमदार वसंतराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचंड स्पर्धेअंती भाजपकडून राजेश पवार हे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राजेश पवार यांची बाजू मजबूत झाली आहे. राष्ट्रवादीतून प्रवेश केलेले मारोतराव कवळे वंचित बहुजन आघाडीकडून नशीब अजमावत आहेत. नायगाव मतदारसंघातून ११ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हदगाव-हिमायतनगर
हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून आमदार नागेश पाटील आष्टीकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसकडून माधवराव पाटील जवळगावकर हे निवडणूक लढवत आहेत. तर, नाराज असलेले गंगाधर पाटील चाभरेकर शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीकडून जाकेर चाऊस हे मैदानात आहेत. हदगाव मतदारसंघात चोरंगी लढत होणार असून १५ जण उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

माहूर-किनवट
अदिवासी बहुल भाग असलेल्या या मतदारसंघात भाजपने भीमराव केराम सारखा अदिवासी चेहरा दिला आहे. चोथ्यांदा राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक आपले नशीब अजमावत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. हेमराज उईके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा -व्यंगचित्राच्या माध्यमातून बच्चू कडूंचा भाजपवर 'प्रहार'

देगलूर-बिलोली
अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. शिवसेनेकडून आमदार सुभाष साबणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर हे साबणेंशी पुन्हा एकदा लढत देणार आहेत. रामचंद्र भरांडे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. देगलूर मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित असून नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

मुखेड
या मतदारसंघात भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. अखेरच्या क्षणी आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. काँग्रेसकडून भाऊसाहेब मंडलापुरकर हा नवा चेहरा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून जीवन दरेगावे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात चार उमेदवार रिंगणात असून तिरंगी लढत येथे होणार आहे.

Intro:नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदातसंघात तिरंगी-चौरंगी लढती...; युती आघाडीपुढे बंडखोरीचे आव्हान...!

नांदेड: जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण अलीकडच्या काळात भाजपा-शिवसेनेचे बळ वाढल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बरीच कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपा-शिवसेनेचे बळ वाढले असले तरी लोकसभेसारखी स्थिती जिल्ह्यात नाही. विधानसभा निवडणुकीत शासनावर असलेल्या नाराजीचा फटका यावेळी भाजपा-सेनेला बसणार आहे. तर काँग्रेसनेही पराभवाचे चांगलेच मनावर घेतले असून गतवेळेपेक्षा यावेळी चांगलीच तयारी केल्याचे दिसून येत आहे. युती-आघाडी पुढे बंडखोरीचे आव्हान आहे.
Body:नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदातसंघात तिरंगी-चौरंगी लढती...; युती आघाडीपुढे बंडखोरीचे आव्हान...!

नांदेड: जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण अलीकडच्या काळात भाजपा-शिवसेनेचे बळ वाढल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बरीच कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपा-शिवसेनेचे बळ वाढले असले तरी लोकसभेसारखी स्थिती जिल्ह्यात नाही. विधानसभा निवडणुकीत शासनावर असलेल्या नाराजीचा फटका यावेळी भाजपा-सेनेला बसणार आहे. तर काँग्रेसनेही पराभवाचे चांगलेच मनावर घेतले असून गतवेळेपेक्षा यावेळी चांगलीच तयारी केल्याचे दिसून येत आहे. युती-आघाडी पुढे बंडखोरीचे आव्हान आहे.

भोकर
----------
भोकर मतदारसंघातून यावेळी खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मैदानात असून गेल्या दोन महिन्यांपासून मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे यावेळी भाजपानेही त्यांच्या विरोधात माजी आ.बापूसाहेब गोरठेकर सारखा तगडा उमेदवार देऊन मैदानात उतवरले आहे. अशोक चव्हाण यांना मतदारसंघातच गुंतवून ठेवण्यात भाजपा सध्यातरी यशस्वी ठरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नामदेव आयलवाड हे आपले नशीब अजमावत आहेत. मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून सात उमेदवार रिंगणात आहेत.

लोहा-कंधार
---------------
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे. पण भाजपाला हा मतदारसंघ सोडवून घेण्यात ते अपयशी ठरले आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. शिवसेनेकडून अँड.मुक्तेश्वर धोंडगे रिंगणात आहेत. खा.चिखलीकर यांचे मेहुणे भाजपचे श्यामसुंदर शिंदे यांनी बंडखोरी करत शेकापच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीने नवा चेहरा दिला असून दिलीप धोंडगे यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे शिवा नरंगलेही आपले नशीब अजमावत आहेत. खा.चिखलीकर यांचे वजन युतीच्या की मेव्हण्याच्या पारड्यात पडेल. यावर येथील स्थिती बरीच अवलंबून आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत असून १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नांदेड दक्षिण
----------------
राज्यात सर्वात जास्त ३८ उमेदवार या मतदारसंघातून रिंगणात आहेत. जिल्ह्यात भाजपा-शिवसेना एकदिलाने ही निवडणुकीची लढाई लढतील अशी चिन्हे दिसत नाहीत. खुद्द भाजपचे महानगराध्यक्ष यांनी राजीनामा देऊन बंडखोरी केली आहे. तर भाजपा- शिवसेना युतीकडून सौ. राजश्री पाटील ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने नवीन चेहरा दिला असून मोहनराव हंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने फारुख अहमद यांना उमेदवारी दिली आहे. तर एमआयएमने काँग्रेसमधून प्रवेश केलेले नगरसेवक साबेर चाऊस यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात पंचरंगी लढत होण्याची चिन्हे असून कोणामुळे-कोणाची सीट धोक्यात येईल की लाभ होईल हे चित्र सध्यातरी स्पष्ट नाही.

नांदेड उत्तर
--------------
झपाट्याने या मतदारसंघात वस्ती वाढ होत आहे. भाजपा-शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी येथून तयारी सुरू केली होती. शिवसेनेच्या एका कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडून नगरसेवक बालाजी कल्याणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून माजी मंत्री डी. पी.सावंत हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून मुकुंद चावरे हे निवडणूक लढवत आहेत. तर एमआयएम कडून फेरोजलाला हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकंदरीत या मतदारसंघात चौरंगी लढत असून २४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

नायगाव
-----------
नायगाव मतदारसंघात तिसऱ्यांदा काँग्रेसकडून आ.वसंतराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचंड स्पर्धेअंती भाजपाकडून राजेश पवार हे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राजेश पवार यांची बाजू मजबूत झाली आहे. तर राष्ट्रवादीतून प्रवेश केलेले मारोतराव कवळे वंचित बहुजन आघाडीकडून नशीब अजमावत आहेत. नायगाव मतदारसंघातून ११ जण उमेदवारीच्या रिंगणात आहेत.

हदगाव-हिमायतनगर
--------------------------
हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून आ.नागेश पाटील आष्टीकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसकडून माधवराव पाटील जवळगावकर हे निवडणूक लढवत आहेत. तर नाराज असलेले गंगाधर पाटील चाभरेकर शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून जाकेर चाऊस हे मैदानात आहेत. हदगाव मतदारसंघात चोरंगी लढत होणार असून १५ जण उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

माहूर-किनवट
----------------
अदिवासी बहुल भाग असलेल्या या मतदारसंघात भाजपाने भीमराव केराम सारखा अदिवासी चेहरा दिला आहे. तर चोथ्यादा राष्ट्रवादीचे आ.प्रदीप नाईक आपले नशीब अजमावत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून प्रा.हेमराज उईके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

देगलूर-बिलोली
------------------
अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. शिवसेनेकडून आ.सुभाष साबणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून माजी आ.रावसाहेब अंतापुरकर हे साबणे शी पुन्हा एकदा लढत देणार आहेत. रामचंद्र भरांडे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. देगलूर मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित असून नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

मुखेड
--------
या मतदारसंघात भाजपामध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. अखेरच्या क्षणी आ.डॉ.तुषार राठोड यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. काँग्रेसकडून भाऊसाहेब मंडलापुरकर हा नवा चेहरा दिला आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून जीवन दरेगावे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात चार उमेदवार रिंगणात असून तिरंगी लढतीची होणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.