ETV Bharat / state

नांदेडमध्ये बुधवारी १४९ अहवाल निगेटिव्ह, तर एक जण कोरोनामुक्त

author img

By

Published : May 14, 2020, 10:07 AM IST

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 3 हजार 142 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 131 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 879 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 157 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे.

nanded corona update  nanded corona positive cases  nanded corona patient death  नांदेड कोरोना अपडेट  नांदेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  nanded corona free patient
नांदेडमध्ये बुधवारी १४९ अहवाल निगेटिव्ह, तर एक जण कोरोनामुक्त

नांदेड - शहरात मंगळवारी एकाच दिवशी ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. मात्र, बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १४९ अहवाल निगेटिव्ह आले. तसेच अबचलनगर येथील रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर तो कोरोनामुक्त झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 3 हजार 142 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 131 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 879 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 157 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात आतापर्यंत घेतलेल्या स्वॅबपैकी एकूण 63 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या 63 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11 रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे, तर पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 43 रुग्णांवर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले हे रुग्ण रक्तदाव, मधुमेह या आजाराने बाधित होते.

रक्तदाब, मधुमेह आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये 'आरोग्य सेतू ॲप' डाऊनलोड करून घ्यावे, जेणेकरून आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती -

  • आत्तापर्यंत एकूण संशयित - 2050
  • एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 1937
  • क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 707
  • अजून निरीक्षणाखाली असलेले - 107
  • पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 202
  • घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 1735
  • एकूण नमुने तपासणी- 2133
  • एकूण पॉझिटीव्ह रुग्ण- 63
  • पैकी निगेटीव्ह - 1879
  • नमुने तपासणी अहवाल आज बाकी- 157
  • नाकारण्यात आलेले नमुने - 6
  • अनिर्णित अहवाल – 27
  • कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5
  • जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी - 103142, या प्रवाशांना घरात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.