नांदेड - कुख्यात गुंड हरविंदर सिंग उर्फ रिंदा संधू याचा साथीदार आकाशसिंग जगतसिंग गाडीवाले (वय, ३० रा.मगनपुरा) याला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले. पंजाब पोलिसांनी नांदेड पोलिसांकडे त्याचे हस्तांतरण केले. यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
आकाश सिंग याच्या विरुध्द खून, खुनाचे प्रयत्न, दरोडे, खंडणी वसुली २५ गुन्हे नांदेड पोलीस आणि पंजाबमध्ये दाखल आहेत. पंजाबमधून नांदेडमध्ये येवून टोळीही निर्माण केली. याच टोळीने ९ एप्रिल २०१९ रोजी कौठा भागातील बॉम्ब शोध पथकाच्या कार्यालयाजवळ एकाची गोळी घालून हत्या केली होती.
हेही वाचा - परभणी कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे दोन महिन्यातच करपली; शेतकऱ्यांना मोठा फटका!
आरोपी आकाश सिंग चंदीगडच्या कारागृहात बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेड पोलिसांनी पंजाब गाठले. आरोपीला चंदीगडच्या कारागृहातून 'ट्रान्झिट वॉरंट'च्या आधारे सशस्त्र बंदोबस्तात औरंगाबादला आणले. मोक्का विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.
हेही वाचा - मुंबईत गणेशोत्सवात विद्यार्थ्यांकडून पर्यावरण रक्षणासाठी पथनाट्यातून जागृती
उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यासोबत पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, शिवाजी डोणगावे, बालाजी पायलगावे, प्रेमानंद झिंगटे, एकनाथ, मनोज नलावडे, शंकर नलबे, मोहम्मद गौस यांच्या पथकाने हि कारवाई केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील करत आहेत.