नांदेड - कोरोनाच्या भीतीने नांदेडमध्ये बहुतांश डॉक्टरांनी आपले खासगी दवाखाने बंद केले आहेत. मात्र, या बरोबरच अशा संकटाच्या काळातदेखील काही डॉक्टर आपले दवाखाने सुरू ठेऊन रुग्णाची सेवा करत आहेत.
नांदेडमधील निमा संघटनेच्या वतीने डॉ. श्रीराम कल्याणकर व डॉ. प्रमोद अंबाळकर यांनी आपले दवाखाने सुरू ठेवले आहेत. त्यांनी रुग्णांना लॉकडाऊनच्या काळात खिशाला झळ बसू नये, याची काळजी घेत स्व-खुशीने फी पेटीत टाकावी, असे आवाहनदेखील केले आहे. तसेच जमा झालेल्या पैशातून गोरगरीब व गरजूंना धान्य देणार असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बहुतांश खासगी दवाखाने बंद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, पोटदुखी अशा किरकोळ आजारांवर उपाचार घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची धावपळ होत आहे.