ETV Bharat / state

Navratri 2022 : महारष्ट्राची नव दुर्गा; स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जागर - Female feticide rate

नवरात्र उत्सव ( Navratri 2022 ) हा स्त्री शक्तीचा जागर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. समाजात पुरुष अधिक सामर्थ्यशाली समजला जातो. परंतु आपल्या संस्कृतीत देविदेवतांनीही अनेक असुरांचा वध करुन स्त्रीसुद्धा पुरुषापेक्षा कमी सामर्थ्यशाली नसल्याचे दाखले आहेत.

Navratri 2022
Navratri 2022
author img

By

Published : Sep 28, 2022, 12:18 PM IST

नांदेड - नवरात्रोत्सव ( Navratri 2022 ) स्त्री शक्तीचा जागर म्हणून साजरा केला जात आहे. आपल्या राज्यघटनेनेही देशात स्त्री-पुरुष समानता ( gender equality )असल्याचे म्हटले आहे. परंतु वास्तविकता मात्र वेगळी आहे. नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा होणाऱ्या समाजातच गर्भातच स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाणही चिंतीत करणारे ( fight against Female feticide ) आहे. प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ व प्रख्यात कवियित्री डाँ. वृषाळी किन्हाळकर यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ही खंत व्यक्त केली.

डॉ.वृषाली किन्हाळकर

वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव - आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव सांगत डाँ. वृषाली किन्हाळकर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या, माझ्या रुग्णालयात मुलगी जन्मली की, आई-बापांना, नातेवाईकांना फार आनंद झालेला दिसत नाही. पहिली एक-दोन मुले असतील आणि नंतर जर मुलगी झाली तर आई-बाप, नातेवाईक खुष होतात. जिलेबी वाटतात. परंतु पहिली मुलगी झाली तर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा नैराश्यच जास्त ( Girl Birth Is Sad Situation ) असते.

प्रसूती शास्त्रात क्रांती - सोनोग्राफी यंत्राच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने प्रसूती शास्त्रात क्रांती केली. या तंत्रज्ञानाने सुदृढ पिढी जन्माला घालण्यास मदत झाली. परंतू याच तंत्रज्ञानामुळे समाजात स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाणही वाढल्याची ( Female feticide rate ) खंत डाँ. किन्हाळकर यांनी व्यक्त केली. आमचं जेव्हा लग्न झाला त्यानंतर मी देवाकडे रोज प्रार्थना केली कि मला मुलगी होऊ दे. कारण मी जे काम स्त्रीरोग तज्ज्ञ झाली तेव्हा पासून जे समाजात काम हाती घेतला होत त्याची सुरवात माझ्या पासून सुरु करू याला माझ्या घरच्यांनी पाठिंबा दिला

शरद पवार यांचा पाठिंबा - नंतर माझे मिस्टर हे राजकारणात सक्रिय झाले त्यांना पवार साहेबानी उमेदवारी दिल्यावर निवडून आले मंत्री झाले त्या वेळेला घरात पवार साहेबांचा फोटो लावला होता मग मुलगी 3 वर्षाची झाल्यावर सासू सासरे यांनी दुसरा मुलं व्हावं म्हणून अस्या गोष्टी सुरु झाल्या होता. त्या वेळेला माझे सासरे पवार साहेबाना आदर्श म्हणत होते माझ्या मुलाला मंत्री केला म्हणून ते त्यांना खूप आदर करत होते. जेव्हा दुसरा मुल हा विषय आला कि मी सासऱ्यांना पवार साहेबांचा फोटो दाखवयाचे आणि त्यांना हि सांगत होते त्यांना सुद्धा एक मुलगी आहे. आम्ही त्यांचा विचारा वर चालणार म्हणून मी विषय तो तिथंच सोडून द्याचे. त्यामुळे मला शरद पवार यांचा फोटोची खूप मदत झाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.