ETV Bharat / state

कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँका व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आखडता हात, नांदेडमध्ये केवळ 19 टक्केच कर्ज वाटप - महाराष्ट्र ग्रामीण बँक

नांदेड जिल्ह्यातील 67 हजार 497 शेतकऱ्यांना 385 कोटी 90 लाख रुपये (19.61 टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

नांदेडमध्ये केवळ 19 टक्केच कर्ज वाटप
author img

By

Published : Aug 3, 2019, 9:37 PM IST

नांदेड - जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकांनी हात आखडता घेतला आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 5 टक्के तर महाराष्ट्र ग्रामीण बँकांनी केवळ 18 टक्केच कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.

नांदेडमध्ये केवळ 19 टक्केच कर्ज वाटप

नांदेड जिल्ह्यातील 67 हजार 497 शेतकऱ्यांना 385 कोटी 90 लाख रुपये (19.61 टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे. जिल्हा बँकेने उद्दिष्टाचा टप्पा पार केला असून , एकूण 50 हजार 361 शेतकऱ्यांना 200 कोटी 42 लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे. तर राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका, खासगी बँका पीक कर्जवाटपात पिछाडीवर आहेत.

2019-20 च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना 1 हजार 967 कोटी 51 हजार रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोमवारपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी 1 हजार 360 कोटी 7 लाखांपैकी 6 हजार 724 शेतकऱ्यांना 71 कोटी 50 लाख रुपये (5.26 टक्के) कर्जवाटप केले. खासगी क्षेत्रातील बँकांनी 151 कोटी 67 लाखांपैकी 3 हजार 386 शेतकऱ्यांना 63 कोटी 1 लाख रुपये (41.54 क्के ) पीक कर्जवाटप केले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 277 कोटी 17 लाखांपैकी 7 हजार 26 शेतकऱ्यांना 50 कोटी 97 लाख रुपये (18. 39 टक्के) पीक कर्जवाटप केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 178 कोटी 60 लाखांपैकी 50 हजार 361 शेतकऱ्यांना 200 कोटी 42 लाख (112.22 टक्के ), तर राष्ट्रीयीकृत बँकांची गती अतिशय संथ आहे. ग्रामीण बँकेचे कर्जवाटप 25 टक्के, तर खासगी बँकांचे पीक कर्जवाटप 50 टक्क्यांच्या आत आहे.

नांदेड जिल्ह्यातील बँक पीक कर्जवाटपाची टक्केवारी-

  1. राष्ट्रीयीकृत बँका- 5.26 टक्के
  2. खासगी बँका - 41 .54 टक्के
  3. म. ग्रा. बँक - 18.39 टक्के
  4. जिल्हा बँक- 112.22 टक्के

Intro:Body:नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कर्जवतापात आखडता हात; जिल्ह्यात केवळ १९ टक्केच कर्ज वाटप...!

नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकांनी हात आखडता घेतला आहे.राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ पाच टक्के तर महाराष्ट्र ग्रामीण बँकांनी केवळ अठरा टक्केच कर्ज वाटप केले आहे. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मात्र सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील ६७ हजार ४९७ शेतक - यांना ३८५ कोटी ९० लाख रुपये ( १९ . ६१ टक्के ) पीककर्ज वाटप करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे. जिल्हा बँकेने उद्दिष्टाचा टप्पा पार केला असून , एकूण ५० हजार ३६१ शेतक - यांना २०० कोटी ४२ लाख रुपये पीककर्ज वाटप केले. राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, खासगी बँका पीक कर्जवाटपात पिछाडीवर आहेत.
२०१९ - २० च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १ हजार ९६७ कोटी ५१ हजार रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले . सोमवारपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी १ हजार ३६० कोटी ७ लाखांपैकी ६ हजार ७२४ शेतक - यांना ७१ कोटी ५० लाख रुपये ( ५ . २६ टक्के ) कर्जवाटप केले . खासगी क्षेत्रातील बँकांनी १५१ कोटी ६७ लाखांपैकी ३ हजार ३८६ शेतक - यांना ६३ कोटी १ लाख रुपये ( ४१ . ५४ टक्के ) पीक कर्जवाटप केले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २७७ कोटी १७ लाखांपैकी ७ हजार २६ शेतक - यांना ५० कोटी ९७ लाख रुपये ( १८ . ३९ टक्के ) पीक कर्जवाटप केले . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १७८ कोटी ६० लाखांपैकी ५० हजार ३६१ शेतक - यांना २०० कोटी ४२ लाख ( ११२ . २२ टक्के ) , तर राष्ट्रीयीकृत बँकांची गती अतिशय संथ आहे . ग्रामीण बँकेचे कर्जवाटप २५ टक्के , तर खासगी बँकांचे पीक कर्जवाटप ५० टक्क्यांच्या आत आहे.

नांदेड जिल्ह्यातील बँक पीक कर्जवाटपाची टक्केवारी

राष्ट्रीयीकृत बँका- ५ . २६
खासगी बँका- ४१ . ५४
म. ग्रा. बँक- १८ . ३९
जिल्हा बँक- ११२ . २२Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.