ETV Bharat / state

चिमुकल्यांचा दानशूरपणा.. वर्षभर साठवलेले खाऊचे पैसे दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

author img

By

Published : Apr 1, 2020, 5:05 PM IST

कोरोनाचा सामना करण्यासाठी व सरकारला आर्थिक मदत देण्यासाठी हजारो हात पुढे येत आहेत. असाच एक खारीचा वाटा माहूर येथील दोन विद्यार्थ्यांनी उचललाय. या दोन चिमकल्यांनी आपल्या खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन एक आदर्श समोर ठेवला आहे.

nanded student donate Chief Minister Relief Fund
वर्षभर साठवलेले खाऊचे पैसे दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

माहूर (नांदेड)- कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी व सरकारला आर्थिक मदत देण्यासाठी हजारो हात पुढे येत आहेत. असाच एक खारीचा वाटा माहूर येथील विद्यार्थ्यांनी उचललाय. सैफ व कैफ या दोन चिमकल्यांनी आपल्या खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माहूर येथील तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

माहूरचे विद्यार्थी सैफ फिरोज दोसानी व कैफ सरफराज दोसानी या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणारे खाऊचे पैसे खर्च न करता ते पैसे आपल्या पिग्गी बँकमध्ये जमवले. वर्षभराची जमवलेली रक्कम दोघा भावंडांनी आज तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याकडे सुपूर्द केली.

तहसीलदारांनी केले बालगोपालांचे अभिनंदन -

कोरोनाचा नायनाट व्हावा, ही अंतरिम इच्छा या चुमकल्यांची आहे. ती नक्कीच लवकरच पूर्ण होईल. समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाचा आदर्श घेत खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.